ताज्याघडामोडी

स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची मल्टीनॅशनल कंपनीत निवड स्वेरी प्लेसमेंट मध्ये अग्रेसर

स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची मल्टीनॅशनल कंपनीत निवड

स्वेरी प्लेसमेंट मध्ये अग्रेसर

पंढरपूरः पर्सीस्टंट सिस्टम्स आणि वेबटेक डेव्हलपर्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन मल्टीनॅशनल कंपनींनी घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

         ‘पर्सीस्टंट सिस्टम्स आणि वेबटेक डेव्हलपर्स’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून पर्सीस्टंट सिस्टम्स’ कंपनी करीता वैभव श्रीनिवास खबानी आणि वेबटेक डेव्हलपर्स’ करीता प्रताप शामराव मदगुंडी  या दोन विद्यार्थ्यांची निवड केली. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला अपेक्षित बाबींचा सखोल अभ्यास करून मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षेचा निकालसंशोधनेमानांकनेइन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ठ मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे प्लेसमेंट मध्ये देखील स्वेरीने आघाडी घेतली आहे.  अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना मोठे पॅकेज असलेल्या नोकरीची संधी मिळाल्यामुळे विशेषतः पालक देखील समाधानी असतात. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तस्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम. एम. पवारस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

4 days ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

5 days ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 week ago

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…

2 weeks ago