ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा १लाख रू. बक्षिस -अभिजित पाटील

कोरोनामुळे पंढरपूर तालुक्याची खुप मोठी हानी झाली आहे. अजून ही कोरोनाचा धोका संपला नाही.
जनसामान्यांना कोरोनाचा व अतिवृष्टीचा मानसिक आणि आर्थिक फटका बसल्याने जनसामान्याचे जीवन विस्कळीत झाले आहे.
येत्या 23 तारखेपासून ग्रामपंचायतचे नॉमिनेशन फॉर्म भरणे व 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या कालावधीत कोरोनाचा फैलाव वाढू नये व कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतीला आर्थिक झळ लागू नये यासाठी अभिजीत पाटील यांच्यावतीने  पंढरपूर तालुक्यात ज्या बिनविरोध ग्रामपंचायत होतील त्यांना यांच्यावतीने १लाख रू. बक्षिस म्हणून देण्याची नाविन्या पुर्ण संकल्पना जाहिर केली.हि संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबल्याने सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
याकाळामध्ये आपण ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावातील वाद विवाद,गट तट बाजूला ठेवत ग्रामपंचायत बिनविरोध करावी. गावातील होतकरू, निर्व्यसनी,योजनाची माहिती असणारे तरूणांनी व सर्व जेष्ठांनी आपल्या गावासाठी सहभागी व्हावे. यातूनच गावाचा विकास होण्यासाठी हातभार लागेल. राज्यामध्ये शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तीन टोकाच्या विचारांचे तीन पक्ष एकत्र येऊन जर सरकार स्थापन करू शकतात तर आपल्याला आपल्या गावामध्ये आपली ग्रामपंचायत बिनविरोध का करू शकत नाही. हि विचार करण्याची बाब आहे.या उपक्रमामुळे पंढरपूर तालुका राज्यासमोर एक आदर्श निर्माण करेल.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago