ताज्याघडामोडी

स्वेरीच्या तीन विद्यार्थ्यांची मल्टीनॅशनल कंपनीत निवड स्वेरी प्लेसमेंटमध्ये यंदाही अग्रेसर

        पंढरपूरः ‘पॅरामॅट्रिक्स, आय-इसेस आणि एनटीटी डेटा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तीन मल्टी नॅशनल कंपनीनी घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

        ‘पॅरामॅट्रिक्स,आय-इसेस आणि एनटीटी डेटा’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून पॅरामॅट्रिक्स’ करीता अक्षय टोपगे, ‘आय-इसेस’ करीता आकाश सुरवसे आणि एनटीटी डेटा’ करीता आरती गोडसे या तीन विद्यार्थ्यांची निवड केली. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतातयाचा सखोल अभ्यास करून मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षेचा निकालसंशोधनेमानांकनेइन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ठ मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे प्लेसमेंट मध्ये देखील स्वेरीने आघाडी घेतली आहे. यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाल्यामुळे  विशेषतः पालक वर्गात समाधानाची भावना निर्माण झाली आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तस्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम. एम. पवारस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या या तीनही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago