पंढरपूरः ‘प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी), एम.टेक., फार्मसी (पदवी व थेट द्वितीय वर्ष) व एम.बी.ए (पदव्युत्तर पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेला (कॅप) मुदतवाढ देण्यात आली असून आता प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.इ.अथवा बी. टेक.) ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप रजिस्ट्रेशन) साठी मंगळवार दि.२२ डिसेंबर २०२० पर्यंत, थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, फार्मसी व थेट द्वितीय वर्ष पदवी फार्मसी (डी.एस.वाय) साठी सोमवार, दि.२१ डिसेंबर २०२० पर्यंत, एम. फार्मसीसाठी बुधवार, दि. २३ डिसेंबर २०२०, एम.ई./ एम.टेक. साठी गुरुवार, दि.२४ डिसेंबर २०२० पर्यंत तर एम.बी.ए (पदव्युत्तर पदवी) साठी रविवार, दि.२० डिसेंबर २०२० अशा स्वरूपात विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला (कॅप रजिस्ट्रेशन) मुदतवाढ देण्यात आली आहे.‘ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
यापूर्वी दि.०९ डिसेंबर २०२० पासून प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीची ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली होती व दि. १५ डिसेंबर ला संपणार होती पण अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाशी संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध झाली नव्हती हे पाहून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून व काही अपुऱ्या तांत्रिक बाबी यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत असून स्वेरी अभियांत्रिकीमध्ये सॅनिटायझेशन व सोशल डिस्टनसिंग पाळून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर मुदतवाढ व प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. प्रवेश प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात प्रवेश अर्जांचे ऑनलाईन कन्फर्मेशन, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम व द्वितीय फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी बाबींचा समावेश आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी (९८६०१६०४३१), स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८), प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे (९५४५५५३८७८), प्रा. मनोज देशमुख (९९७०२७७१५०), प्रा. उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) तसेच एम. बी. ए. करीता प्रा. करण पाटील (९५९५९२११५४) तर फार्मसी करिता प्रा. प्रज्ञा साळुंखे (९४०४९९१८११) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…