सोलापूर जिल्हा परिषदेचा पंढरपूर बांधकाम विभाग हा कायम आपल्या कार्यपद्धतीमुळे आणि पदाधिकाऱ्यांच्या दबावास बळी पडत असल्याच्या सातत्याने होत असलेल्या आरोपामुळे वादग्रस्त ठरला असल्याचे दिसून येते.मजूर सहकारी संस्थांना कामे देताना त्यांच्याकडून पात्रता प्रमाणपत्र पडताळणी करूनच दिली जावीत असे शासनांचे आदेश असतानाही पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील अथवा संबंधित मजूर संस्थांना कामे देताना हॉटमिक्स प्लांट ची अट शिथिल करता यावी यासाठी रस्त्याचे सलग काम असताना त्याचे तुकडे पाडून काम दिले जात असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या.मात्र या तक्रारींना केराची टोपली दाखविली जात होती.मात्र आता राज्य कंत्राटदार अभियंता संघटनेने केलेल्या तक्रारीनुसार अनेक वेळा छोट्या ठेकेदारांना काम मिळू नये यासाठी २५१५ हेड खालील कामे बड्या ठेकेदारांना देता यावीत यासाठी या कामाचे एकत्रीकरण केले जात असल्याच्या आरोप करीत आता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेने आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेने आज प्रत्यक्ष जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी* दिलिप स्वामीसो, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडेसो तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र१ चे कार्यकारी अभियंता पी.डी कदमसो व बांधकाम विभाग क्रं २ चे कार्यकारी अभियंता पी.आर कदम यांना निवेदन दिले असून,सोलापुरातील जिल्हा परिषद मध्ये ग्रामविकास विभागाखकडील २५१५ लेखा शीर्षकाखाली मंजूर झालेले व निधी उपलब्ध झालेले पंढरपूर, माढा ,माळशिरस या तालुक्यातील व विभागातील छोटी छोटी अंदाजे पाच लक्ष ते दहा लक्ष्य ची किंमत असलेले पन्नास कामे एकत्र करून नियमबाह्य पद्धतीने clubbing करुन अंदाजे तीन मोठ्या निविदा अंदाजे ६ कोटी,२.९६ कोटी व १ कोटी संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र१ व २ काढलेल्या आहेत हे सर्व निषेधार्थ आहे व नियमबाह्य आहे.clubbing न करण्याचा शासन निर्णय व तसेच एक वर्षापुर्वी संघटनेच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्याच्या निर्णयाची प्रत जोडली होती यामध्ये स्थानिक रोजगार ला प्राधान्य देण्यासाठी व एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या छोट्या मोठ्या कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता,मजुर सहकारी संस्था यांच्या उपजिवेकेची जबाबदारी ही शासनाची आहे अशी स्पष्ट निर्देश कोर्टाने दिला असताना परत clubbing करुन या विभागातील ४०० अभियंता व कंत्राटदार यांच्या वर काम न देता प्रंचड मोठा अन्याय संबंधित विभागाने केलेला आहे हे लक्षात आणले सदर निविदा संगनमत करून एकाच मोठ्या कंत्राटदार यांस देण्याचा प्रशासनाचा हेतू आहे व यापाठीमागे मोठी आर्थिक उलाढाल झालेली स्पष्ट दिसत आहे हे शिष्टमंडळ निर्दशनास आणले आहे हे गंभीर स्वरूपात दखल घेण्यासारखेच आहे दिवसाढवळ्या सरकारच्या तिजोरीवर हात साफ करण्यासाठीच केलेली निविदा प्रक्रिया ची व्युवहरचना आहे हे दिसत आहे असे कधीच यापूर्वी पन्नास वर्षांत जिल्हा परिषद मध्ये घडले नाही असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने सध्या मागविण्यात आलेल्या पंढरपूर तालुक्यातील विविध कामांच्या ऑनलाईन निविदा प्रक्रियेत पंढरपूर तालुक्यातील पुळूज आणि खर्डी येथील कामांच्या निविदा प्रकाशित झाल्या आहेत.या ऑनलाईन निविदा ओपन करण्याचा प्रयत्न केला असता खर्डी येथील निविदेची माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक केले असता मंगळवेढा तालुक्यातील कामाची निविदा दिसून येत आहे.हा प्रकार पहिल्यांदाच घडला नसून यापूर्वीही असेच प्रकार घडले आहेत अशी चर्चा असतानाच या बाबत पंढरी वार्ताच्या वतीने निविदेत नमूद करण्यात आलेल्या लॅनलाईन नंबरवर कॉल केला असता सदर फोन बंद असल्याचे सांगण्यात येते तर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पंढरपूर येथील अधिकाऱ्याशी संपर्क केला असता हा सोलापूर येथील क्लार्कच्या हातून चुकीने घडलेला प्रकार आहे असे सांगण्यात आले.
एकूणच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यपध्दतीबद्दल सामान्य जनतेमधून नाराजी व्यक्त होत असतानाच आता थेट जिल्हा परिषद बांधकाम विभागाशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेनेच जे पन्नास वर्षात कधी घडले नाही असे प्रकार बांधकाम विभागात घडत असल्याचे आपल्या निवेदनात नमूद केल्यामुळे जिल्हा परिषदेचे नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी या निवेदनाची दखल घेतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने थाटात उदघाटन करण्यात आलेले पोर्टल दिशाभूल करणारे
जिल्हा जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे माजी आमदार दीपक साळूंखे यांच्या भगिनी जयमाला गायकवाड यांच्या हाती होते तेव्हा तत्कालीन आमदार दीपक साळूंखे यांच्या हस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध योजनांर्तगत सुरु असलेली कामे,विविध निविदा,बांधकाम विभागाच्या दोन्ही विभागाअंतर्गत सुरु असलेल्या कामांची सद्यस्थिती याची माहिती देणाऱ्या पोर्टलचे उदघाटन करण्यात आले होते.मात्र हे पोर्टल केवळ नामधारी ठरले होते व यावर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एरर असा संदेश येत होता.आता तर हे पोर्टल जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर शोधून देखील सापडत नाही त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग जनतेपासून ”काहीतरी” तरी दडवू पहात आहे अशीच धारणा निर्माण झाली आहे.