पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील सत्यवान प्रभू गाजरे हे मोटारसायकल पंक्चर काढून उदरनिर्वाह करतात. एक मुलगी विवाहित आहे तर दुसरी मुलगी स्वप्नाली हि वाडीकुरोली येथील महाविद्यलयात ११ वीचे शिक्षण घेत होती.व शिक्षणासाठी रोज येजा करत होती.मात्र लॉकडाऊनच्या काळात घरीच राहून ती ऑनलाईन अभ्यास करत होती.मात्र गावातील काही उनाड तरुणांच्या छेडछाडीला ती पुरती कंटाळली होती आणि या छळास कंटाळूनच स्वप्नाली सत्यवान गाजरे (वय १७ ) अल्पवयीन मुलीने ६ डिसेंबरच्या मध्यरात्री आत्महत्या केली असून या घटनेमुळे शेळवे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या बाबत सविस्तर हकीकत अशी कि,सत्यवान प्रभु गाजरे वय-43 व्यवसाय- पंम्चर दुकान रा.शेळवे ता.पंढरपुर मयत मुलगी स्वप्नाली ही इयत्ता 11वी मध्ये केबीपी काँलेज येथे शिकत होती. ती दररोज मोटार सायकलवरून येऊन जाऊन करत होती. शुभांगी ही इयत्ता 12वी मध्ये वाङीकुरोली येथे काँलेजला जात होती .सध्या लाँक ङाऊन काऴात आँनलाईन शिक्षण घरीच घेत होती .माझी मयत मुलगी स्वप्नाली सत्यवान गाजरे वय17वर्ष रा.शेऴवे ता. पंढरपूर ही मोटार सायकलची पंक्चर काढणेस मला मदत करत होती. दिनांक 6/12/2020रोजी 21/00ते दिनांक7/12/2020रोजी पहाटे 04/00वा.चे दरम्यान आमच्या राहत्या घरी ती अभ्यास करीत असलेल्या खोलीमध्ये कोणत्यातरी अज्ञात कारणाने पत्र्याच्या अँगलला ओढणीने गऴफास घेऊन आत्महत्या केली होती.दि 09/12/2020 रोजी साधारण सायंकाळी 05/00 वा. सुमारास मी मयत स्वप्नाली हिचे शाळेची सँक तपासले असता त्यात दोन कयरची वही असुन त्यामध्ये लाल पेनाने अर्धे पानाची चिठ्ठी मिळुन आली त्यावर तिने पुढील प्रमाणे मजकुर लिहलेला आहे. किती सहन करु मी मला आता अजिबात सहन होत नाही तिरंगा आणी आर्मीचा गणवेश माझ्या नशीबात नाही कारण रमेश गाजरे, लहु ट्रेलर, स्वप्नील कौलगे यांनी माझ्या स्वप्नाचा तर धुराळाच केलाय. रमेश गाजरेन हात धरुन केलेली छेडछाड आणी कुणाला सांगु नको म्हणुन दिलेली जीव मारणार ही धमकी मला सहन होत नाही लहु ट्रेलर स्वप्नीलला घेवुन दुकानात मोठमोठ्याने घाणरेडी गाणी लावायचा नाही तसल्या पोरांना घेवुन नाचायचा सगळी स्वप्नील स्वप्नाली म्हणुन नववी पसनच चिडवायची. जाता – येता त्यांच्या नजरेचा मला लय त्रास व्हायचा आजपर्यंत सहन केल पण आता सहन होत नाही म्हणुन मी आज माझ जीवन संपवतेय . हे भारत माते मला माफ कर , आई बापु मला माफ करा आत्महत्या करण गुन्हा आहे तरीसुध्द मी करतेय तुमची स्वप्नाली असे चिट्टीत मजकुर आहे.
सुमारे दोन वर्षापुर्वी मयत मुलगी स्वप्नालीने वडील सत्यवान गाजरे यांना, लहु परमेश्वर गाजरे व स्वप्नील कांतीलाल गाजरे हे दोघे मला रोडने जाता येता शिट्या फुकतात व स्वप्नील व स्वप्नाली असे म्हणुन हाक मारतात असे बोलल्यामुळे मला रस्त्याने जाणेयेणे मुश्कील झाले आहे. ते माझी छेडछाड करतात सांगितले होते.त्यावेळी सदर मयत मुलीचे वडील सत्यवान गाजरे यांनी लहु गाजरे व स्वप्नील कौलगे यांना तुम्ही मुलीची छेडछाड का करता असे विचारले पुन्हा छेडछाड करू नका अशी ताकीद दिली होती. 1) लहु परमेश्वर गाजरे 2) स्वप्नील कांतीलाल कौलगे 3)रमेश निवृत्ती गाजरे सर्व रा. शेळवे ता. पंढरपुर यांनी माझी मयत मुलगी स्वप्नाली गाजरे हिने लिहलेल्या चिट्टीतील मजकुराप्रमाणे वरील आरोपींनी छेडछाड केल्याने तिला त्यांचा त्रास सहन न झालेने त्याच्या त्रासाला कंटाळुन व त्यांनीच माझे मुलीस आत्महत्या करणेस प्रवृत्त केल्याने माझ्या मुलीने दि 06/12/2020 रोजी रात्रौ 09/00 ते दि 07/12/2020 रोजीचे पहाटे 04/00 वा. चे दरम्यान आत्महत्या केली आहे.अशी फिर्याद मयत मुलीचे वडील सत्यवान गाजरे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
हा आत्महत्येचा प्रकार ६ डिसेंबरच्या मध्यरात्री घडला होता,मात्र पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत तातडीने गुन्हा दाखल करावा अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला होता.
मयत मुलीची सुसाईड नोट सापडताच पित्याने संपर्क केल्यानंतर आम्ही तात्काळ कारवाई केली -पो.नि.प्रशांत भस्मे
फिर्याद दाखल करून घेण्याबात उशीर झाल्याबद्दल पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्याकडे विचारणा केली असता सदर मुलीने आत्महत्या कारण्यापूर्वी लिहलेली सुसाईड नोट हि एका स्याग मध्ये ठेवलेली आढळली त्यानंतर सदर मुलीच्या पित्याने संपर्क करून आम्हाला याची माहिती देताच आम्ही सदर प्रकरणी गुन्हा दाखल करीत आरोपीना तात्काळ ताब्यात घेतले आहे.