पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमधील जुना कराड नाका ते शेळके वस्ती दरम्यानच्या अंतर्गत मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी सदर मार्गावर तातडीने गतीरोधक बसवावेत अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांनी केली आहे.
या मार्गावर बर्याच दिवसापासुन विविध अपघातात अनेकांचा जीव जाता जाता वाचला आहे. कांहीजण गंभीर जखमी सुध्दा झाले आहेत. नुकताच एक अपघात घडला असुन या अपघातातील जखमी व्यक्ती सध्या कोमात असुन त्याचेवर सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच त्याचेसोबतच्या इसमाच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झालेली आहे. अशा पध्दतीचे अपघात टाळण्यासाठी या मार्गावर आवश्यक तेथे गतीरोधक बसविणे व मार्गावरील खड्डे बुजविण्याची अत्यावश्यकता आहे.
या मार्गावरुन अनेक वाहने भरधाव वेगाने ये -जा करत असतात. रहदारीच्या दृष्टीने येथील अंतर्गत मार्ग महत्वाचा आहे. परिसरात असलेले हॉस्पिटल्स, शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेेस यामुळे सदर मार्ग नेहमीच गजबजलेले असतात. यामुळे या परिसरात वास्तव्यास असलेले वयोवृध्द जेष्ठ नागरिक, लहान मुले व विद्यार्थी यांच्यासाठी सदर मार्ग धोकादायक बनला आहे. तरी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून याकडे लक्ष घालुन येथील अंतर्गत मार्गावर आवश्यक तेथे गतीरोधक बसविणे व रस्त्याची दुरुस्ती करणेसाठी तातडीने हालचाल करावी अशा मागणीचे निवेदन लंकेश बुरांडे यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना दिले आहे.
यावेळी यावेळी जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, शिवसेना उपशहर प्रमुख सचिन बंदपट्टे, तानाजी मोरे, शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे, शिवसेना शाखा प्रमुख प्रणित पवार, नारायण रेड्डी, विजय गंगणे शिवसैनिक राघवेंद्र ऐनापुरे, अजय हुलवडे आदी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…