प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु
पंढरपूरः ‘प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकिया (कॅप) बुधवार दि.०९ डिसेंबर २०२० पासून सुरू झाल्या असून, या प्रक्रिया साधारणपणे जानेवारीच्या मध्यापर्यंत चालणार आहेत.‘ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या या प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून स्वेरी अभियांत्रिकी मध्ये सॅनिटायझेशन व सोशल डिस्टनसिंग पाळून ऑनलाईन रजिस्ट्रेशन ची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी ही फी रुपये ८०० एवढी असून इतर सर्व प्रवर्गासाठी ती रुपये ६०० एवढी आहे. सदर फी विद्यार्थी एटीएम अथवा ऑनलाईन बँकिंग च्या सहाय्याने भरू शकतात. प्रवेश प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात प्रवेश अर्जांचे ऑनलाईन कन्फर्मेशन, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम व द्वितीय फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी बाबींचा समावेश आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी (९८६०१६०४३१), स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८), प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे (९५४५५५३८७८), व प्रा. यु. एल. अनुसे (९१६८६५५३६५) तसेच थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) साठी प्रा.एम.ए. देशमुख (९९७०२७७१५०) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…