भारत बंदला सोलापूर जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद

भारत बंदला सोलापूर जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद

पंढरपूर, प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यामध्ये हमाल मापाडी पंचायत व इतर संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला सोलापूर जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनास सोलापूर जिल्ह्यातील हमाल मापाडी पंचायत व विविध संघटनांच्या आज भारत बंदमध्ये सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी शेतकरी आंदोलनाच्या 3 कायदे रद्द करण्याच्या मागणीस संपूर्ण पाठिंबा दिला असून केंद्र सरकारने त्वरीत शेतकरी कायदे रद्द करण्यात यावेत. तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या दुबळ्या करण्याचे षडयंत्र हाणून पाडा, उत्पादन खर्चाचे दिडपट किमान हमीभावास कायदेशीर संरक्षण द्यावे, सर्व उत्पादनांना हमी भाव देऊन संरक्षण द्यावे, शेतकर्‍यांना अवश्यक तेथे सबसिडी उपलब्ध करून द्यावी, व माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून राज्य सल्लागार मंडळ आणि जिल्हा माथाडी मंडळाची तात्काळ स्थापना करण्यात यावी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
सदर मागण्यांचे निवेदन जिल्ह्यातील प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना देण्यात आले. यामध्ये सोलापूर, बार्शी, करमाळा, पंढरपूर, कुर्डूवाडी, माळशिरस आदी ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल तोलार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिवांना सदर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कुमार घोडके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे, जिल्हा सचिव आबाजी शिंदे, अध्यक्ष मारूती बंदपट्टे, देवा गांडुळे, हरिभाऊ कोळी, संतोष सावंत, मधुकर वाघ, राजेंद्र जाधव, भीमा धनवे, अंकुश कदम, शिवानंद पुजारी, नागनाथ खंडागळे, भीमा सिताफळे, सिताराम हिप्परगी, दत्ता मुरूमकर, गफार चांद, पुराणिक महाराज, अ‍ॅड. राहूल सावंत, कमलेश रोडगे, गोरख जगताप, महादेव करडे, ताजोद्दीन शेख, चंद्रकांत मांजरे, सुरेश बागल, बप्पा चव्हाण, लक्ष्मण बागल, लक्ष्मण उपासे आदीसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला.

दिल्ली येथे चालू असलेले शेतकर्‍यांच्या आंदोलनास महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ व सोलापूर जिल्हा हमाल मापाडी पंचायतच्या वतीने संपूर्ण पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधायक मंजूर केलेली ताबडतोब रद्द करण्यात यावे अन्यथा याचा परिणाम केंद्र सरकारला भोगावा लागेल.
– शिवाजी शिंदे,

जिल्हाध्यक्ष हमाल मापाडी पंचायत

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

5 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

5 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago