थंडीचा गारठा वाढला आणि चोरट्यांचा वावर सुरु
पळशी येथील चोरीच्या घटनेत दागिने,रोख रकमेसह ४ लाख १० हजारांचा ऐवज लंपास
गेल्या चार दिवसापासून पंढरपूर तालुक्यात थंडीचा गारठा वाढला असून याचाच फायदा घेत चोरटयांनी आपला हात हात दाखविण्यास सुरुवात केली आहे.थंडीचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी वर्दळ कमी असते याचाच फायदा घेत प्रतिवर्षी याच काळात चोऱ्यांचे सत्र सुरु होत असल्याचे दिसून आले आहे.पळशी ता.पंढरपूर येथे शुक्रवार दिनांक ४ डिसेंबर रोजी रात्री ११ ते पहाटे ४ या दरम्यान झालेल्या चोरीच्या घटनेत येथील चोरटयांनी 1)आडीच तोऴ्याची सोन्याची चैन २)दोन तोळयाचे सोन्याचे मंगळसूत्र ३)दोन तोळयाचे सोन्याचे नेकलेस ४) एक तोळ्याची एक सोन्याची अंगठी ५)अर्धा तोऴयाच्या दोन सोन्याची अंगठी ६)अर्धा तोऴयाची सोन्याची बोरमाळ ७) अर्धा तोऴयाचे सोन्याचे कानातील जुबे ८) दोन ग्रँमचे सोन्याचे कानातील रिंग ९)तीन ग्रँमचे सोन्याचे बदाम १०)एक सँमसँग कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल मुद्देमाल व रोख रक्कम १० हजार असा ऐवज लंपास केला आहे.
या प्रकरणी कैलास पोपट कलागते वय 29वर्षे व्यवसाय शेती ,जात- हिंदु मराठा रा.पळशी ता पंढरपुर यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून घराच्या खिडकीतुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने उघड्या खिडकीद्वारे प्रवेश करुन घरातील लाकडी कपाटाच्या ड्रावरमधुन सोने तसेच पँन्टच्या खिशातील रोख रक्कम व एक पिशवीतील मोबाईल असे वरिलवर्णनाच्या ऐवजाची चोरी केली असल्याचे नमूद केले आहे.
याच दिवशी याच गावातील सदाशिव लोखंडे यांच्या घरीही चोरी झाली असल्याची माहिती मिळाल्याचे फिर्यादीने नमूद केले असून या चोरीचा तपास लावण्याचे मोठे आव्हान आता पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर आहे.तसेच पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीची ग्रस्त वाढवावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.