श्री.विशाल (शेठ) मर्दा मित्र परिवाराच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

श्री.विशाल (शेठ) मर्दा मित्र परिवाराच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न
पंढरपूर –सध्याच्या काळात रूग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा संकटाच्या काळात गरजू रूग्णांना रक्त मिळावे म्हणून श्री.विशाल (शेठ) मर्दा मित्र परिवार यांच्यावतीने आयोजित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहर रेशन धान्य दुकानदार संघटना व पंढरपूर येथील व्यापारी, कामगार यांनी सक्रिय सहभाग घेत उत्स्फूर्तपणे 40 जणांनी या शिबीरात रक्तदान केले .
सदर शिबीर सुरू असताना तहसीलदार  डॉ. सौ.वैशाली वाघमारे मॅडम , पंढरपूर शहर पोलिस निरीक्षक अरूण पवार साहेब, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर  यांनी सदिच्छा भेट देवून आयोजक व रक्तदाते यांना प्रोत्साहन दिले.
सदर रक्तदान शिबिर पंढरपूर ब्लड बॅंक येथे डॉ.श्री.प्रसाद खाडिलकर, डॉ. सौ .संगिता पाटील मॅडम  यांच्या सहकार्याने  आयोजित करण्यात आले होते. श्री.विशाल (शेठ) मर्दा यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने त्यांच्या मित्र परिवाराने अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते परंतु 15 दिवसा पूर्वी श्री. विशाल ( शेठ) यांच्या आज्जी सौ. कौसल्याबाई नारायणदास मर्दा यांचे दुःखद निधन झाल्याने वाढदिवस साजरा न करता रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे मित्र परिवाराने ठरवले व हा उपक्रम अल्पकाळात नियोजन करून यशस्वी केला. अल्पावधीत रक्तदान शिबीराचे आयोजन करून देखील 40 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे दिसून आले. या सामाजिक उपक्रमाचे अनेकांतून कौतुक केले जात आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

6 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago