विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीसह राज्यातील शासनाधीन सर्वच देवस्थान समित्या बरखास्त होणार

 

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीसह राज्यातील शासनाधीन सर्वच देवस्थान समित्या बरखास्त होणार
विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला ?

 

राज्यातील देवस्थान समित्या बरखास्त करून तेथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्णी लावण्यात येणार आहे. त्यानुसार आघाडीने महामंडळे वाटून घेतल्या असून त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती राष्ट्रवादी पक्षाला मिळणार आहे. मुंबईतील सिद्धविनायक सेनेकडेच राहणार असून याशिवाय पंढरपूरची समितीदेखील याच पक्षाला देण्यात येणार आहे. विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच या महामंडळाच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत. यामुळे त्यावर वर्णी लागावी म्हणून इच्छुकांकडून सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.राज्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, सिद्धविनायक मंदिर न्यास मुंबई व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर अशी महत्त्वाची महामंडळे आहेत. या महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता येताच त्यांनी ही महामंडळे वाटून घेतली. गेल्या वर्षी महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सरकारने अनेक महामंडळे बरखास्त केली. पण देवस्थान समित्यामध्ये मात्र कोणताही बदल केला नाही. आता मात्र या समित्या लवकरच बरखास्त करण्यात येणार आहेत.     भाजपच्या ताब्यातील देवस्थान समित्या काढून घेण्यासाठी गेले महिनाभर राज्यपातळीवर हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आघाडीतील मित्रपक्षांनी या समित्या वाटून घेतल्या आहेत. त्यानुसार सिद्धविनायक व पंढरपूरची समिती सेनेकडेच राहणार आहे. सध्या त्याचा कारभार सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसीकर महाराज पाहत आहेत. काँग्रेसला कोणते महामंडळ द्यायचे याबाबत सध्या अंतिम चर्चा सुरू आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हे भाजपचे आहेत. ही समिती बरखास्त करण्यात येणार असून नवीन अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. आता या समितीवर पदाधिकारी नियुक्त करण्याच्या हालचाली आहेत. तसे झाल्यास ही समिती काँग्रेसकडे जाण्याची चिन्हे आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

11 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago