पुणे विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दहा हजार मतांनी आघाडीवर असून, भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे पिछाडीवर आहेत. शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर हे आघाडीवर असून, दुसऱ्या स्थानावर विद्यमान आमदार आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत हे आहेत. तिसऱ्या स्थानावर लोकभारती पक्षाचे गोरखनाथ थोरात असून, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार चौथ्या स्थानावर आहेत. शिक्षक मतदारसंघामध्ये आसगावकर यांना आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची १२५४७ मते, तर सावंत यांना ७७२६ मते मिळाली आहेत. विजयासाठी आवश्यक असलेला कोटा अद्याप निश्चित झालेला नाही. शिक्षक मतदारसंघाचा कोटा काही वेळातच निश्चित होण्याची शक्यता आहे, तर पदवीधर मतदारसंघासाठी रात्री दहाच्या सुमारास कोटा निश्चित होऊ शकेल, असा अंदाज विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी वर्तविला आहे. सध्या वैध मतांचे गठ्ठे तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, मतमोजणी करण्यात येत आहे. प्रत्येकी ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार झाल्यानंतर ते गठ्ठे मोजून कोटा निश्चित होणार आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…