विठ्ठल सहकारी साखर कारखाना आपण व्यवस्थित चालिवणे हीच खरी स्व.नानांना श्रद्धांजली-व्हा.चेअरमन लक्ष्मण पवार
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे आयोजित शोकसभेत अनेकांच्या भावना अनावर
वेणुनगर – गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याचे चेअरमन आमदार कै.भारत तुकाराम भालके यांना अंदाजली वाहन्यासाठी शोक सभेचे आयोजन कारखाना कार्यस्थळावर करण्यात आले होते. सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण नामदेव पवार भावना विवषः होवून म्हणाले की , आजारी असतानाही त्यांना कारखाना व्यवस्थीत चालविणे हाच एकमेव घ्यास त्यांनी घेतला होता.कोरोनाच्या काळातही त्यांनी सोमवार ते शुक्रवार असा मुंबई येथे प्रवास करुन कारखाना सुरु करणेसाठी रक्कम उपलब्ध करुन आणली.त्यामुळे आपण सर्वांनी कारखाना व्यवस्थीत चालविणे हीच खरी कै.आ.भारतनाना यांना खरी अंदाजली ठरेल .
या प्रसंगी मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली. तसेच सतीश देशमुख यांनी कै.भारतनाना यांचेवर त्यांनी तयार केलेली कविता म्हणून दाखविली. अंदाजली वाहताना सर्वांच्याच भावना अनावर झालेल्या होत्या सदर प्रसंगी जेष्ठ संचालक मोहन कोळेकर,युवराज पाटील,विजयसिंह देशमुख,गोकुळ जाधव,सुर्यकांत बागल,दशरथ खळगे,समाधान काळे,संतोष गायकवाड,नेताजी सावंत,उत्तम नाईकनवरे,धनाजी घाडगे ,माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले,दिलीप धोत्रे,गणेश पाटील,मेजर विलास भोसले , दिनकर चव्हाण,रायाप्पा हळणवळ, प्राचार्य डी.आर.पवारसर,दिनकर कदम,किरणराज घाडगे,तुकाराम मस्के,शिवाजी शिंदे,नवनाय पोरे,एम.एस.सी.बकेचे सी.एस.पाटील , आर.डी.पवार,शशिकांत शिरगीरे,सतीश देशमुख,कार्यकारी संचालक,आर.एस.बोरावके , सेक्रेटरी बी.सी.कर्पे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग,कार्यकर्ते,सभासद व हितचितक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली