पदवीधर,शिक्षक मतदारसंघासाठी प्रशासन सज्ज-प्रांताधिकारी-सचिन ढोले

 

पदवीधर,शिक्षक मतदारसंघासाठी प्रशासन सज्ज प्रांताधिकारी-सचिन ढोले

 

मतदान केंद्रावर निवडणुकसाहित्यांसह कर्मचारी रवाना

पंढरपूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील  निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.  तालुक्यातील 8 हजार 151 मतदारांच्या मतदानाकरिता  20 मतदान केंद्रावर 299  मतदान अधिकारी व कर्मचारी  रवाना झाले असल्याची माहिती  प्रांताधिकारी ढोले यांनी दिली आहे.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी  मंगळवारी 1 डिसेंबर रोजी सकाळी 8.00 ते 5.00 यावेळेत मतदान होणार आहे.  पंढरपूर येथून पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस येथील चार तालुक्यातील  नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले असून, या चार तालुक्यातील एकणू 72 मतदान केंद्राचे साहित्य वाटप करण्यात आले. चार तालुक्यातील  शिक्षक मतदारसंघासाठी 28 तर पदवीधर मतदासंघासाठी 44 मतदान  केंद्रावर साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर  तर शिक्षक मतदासंघासाठी पंचायत समिती, शेतकी भवन, पंढरपूर  येथून साहित्य वाटप करण्यात आले.  यासाठी संबंधित तालुक्याचे अधिकारी कर्मचारी यांचीही नेमणूक करण्यात आली होती. मतदान केंद्रावर  कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी 16 जीप 16 बसेस अशा 32  वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती, असेही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.
या निवडणुकीसाठी तालुक्यात 8 हजार 151 मतदार असून,  तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील मतदान केंद्रावर 299 निवडणुक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.  प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षितेसाठी पोलीस कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेसा वीज पुरवठा, शौचालय,  अपंगासाठी रॅमची सुविधा करण्यात आली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुक होत असल्याने मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेण्यात आली  आहे. मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी ढोले यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मतदारासांठी असणाऱ्या रांगेत ठराविक अंतरावर मतदारांना उभे राहता यावे यासाठी  तीन स्वतंत्र्य रांगा करण्यात आल्या आहेत. तसेच मतदारामध्ये समाजिक अंतर रहावे यासाठी चिन्हांकित वर्तुळे करण्यात आली आहेत. मतदारांना आखुन दिलेल्या रांगेतच उभे राहता येणार आहे. मतदारांनी मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत पसंती क्रम अंकात लिहावा. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड-19 च्या आजारबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करुन  आपली जबाबदारी पार पाडावी.  तसेच मतदारांनी आपल्या अमुल्य मताचा हक्क बजावावा असे आवाहनही श्री.ढोले यांनी यांनी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…

2 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 month ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

1 month ago