विकासाचा आराखडा नाही, पदविधारांसाठी कोणतीही संवेदना नाही तेच गॉडफादर असल्याचा आव आणत आहेत !
ज्यांना कोणताही विकासाचा आराखडा नाही, पदविधारांसाठी कोणतीही संवेदना नाही,नोकरी देण्यासाठी योजना नाही, शिक्षणाच्या आणि स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सोयी निर्माण करू शकत नाहीत, ज्यांना नाडवून लाखो रुपये नोकरीत येण्यासाठी घेतले तेच आता पदविधरांचे गॉडफादर बनण्याचा प्रयत्न करताहेत, करोडो रुपये पार्ट्या आणि इतर खर्चासाठी देताहेत, खोटी आमिषे दाखवताहेत आणी आमदार होण्याचे स्वप्न बघताहेत मात्र पदवीधरांना या मतदारसंघात सुरू असलेले अनैतिक राजकीयकरण अजिबात आवडलेले नाही त्यामुळे केवळ सांगोला आणि सोलापुरातीलच पदवीधर नव्हे तर पाच जिल्ह्यातील युवक आपल्याच नावाला पसंती देत आहेत.
पुणे पदवीधर ची निवडणूक २ दिवसावर आली असताना विविध आश्वासनांचा पाऊस पडत आहे आणि कधी नव्हे इतके महत्व संगोल्याला का आले आहे हे देखील पदवीधर मतदार राजा जाणते आहे. निलकंठ खंदारे याना सुटा सोलापूर आणी सुटा कोल्हापूर या प्राध्यापकांच्या संघटनेने जाहीरपणे प्रथम पसंती क्रमासाठी पाठिंबा दिला आहे. गेली २ तपे त्यांनी चळवळीत काढली असल्याने त्यांचा पाचही जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते तालुक्यात सक्रिय झाले आहेत. लोक आपल्याला परीने त्याचा अर्थ काढत आहेत मात्र त्यांच्या मागे निलकंठ खंदारे यांची संघटनात्मक ताकत हेच कारण असल्याचे गुपित ही लोकांना उलगडत आहे. ही निवडणूक आता निर्णायक वळणावर येऊन पोचली असून येत्या १ डिसेंम्बर रोजी उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होईल.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…