आमदार कै. भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाची समाजमनावर वेगळी छाप   -स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे स्वेरीत आमदार भारतनाना भालके यांना श्रद्धांजली

 

आमदार कै. भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाची समाजमनावर वेगळी छाप   -स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे

स्वेरीत आमदार भारतनाना भालके यांना श्रद्धांजली

 

पंढरपूर- ‘पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाने समाज मनावर वेगळी छाप पाडली होती. त्यांच्या कार्यातून एक वेगळेपण दिसून येत होते. आपल्या मतदार संघातील जनतेच्या हृदयात त्यांनी अल्पावधीत स्थान मिळवले होते. कै. नानांच्या वयाचा विचार केला तर त्यांचे हे वय जाण्याचे नव्हते पण दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. हा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेवर मोठा आघात आहे. स्वेरी परिवार आणि गोपाळपुरकरांच्या वतीने त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.’ अशा शब्दात स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी भावनेला वाट मोकळी करून दिली.   

        प्रारंभी स्वेरी व गोपाळपूरच्या नागरिकांच्या वतीने गोपाळपूरचे माजी सरपंच शिवाजीराजे आसबे यांच्या हस्ते दिवंगत आमदार कै.भारतनाना भालके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे हे आमदार कै. भालके यांच्या कार्य-कर्तुत्वावर प्रकाश टाकत होते. यावेळी गोपाळपूरचे माजी सरपंच शिवाजीराजे आसबे म्हणाले की, ‘स्वेरी कॉलेजच्या समोरून नाना नेहमी जात-येत होते परंतु आज त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा दिवस उगवेल असे कधीच वाटत नव्हते. नाना माझे चांगले मित्र होते, सहकारी होते. त्यांच्या अकाली निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून येणे अशक्य आहे.’  स्वेरीचे  संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे म्हणाले की ‘कै. भारतनानांमध्ये विशेष गुण आणि कर्तृत्व होते. ‘राजकारणाला खूप सोपे करुन सांगणारा माणूस’ म्हणून त्यांची जनमाणसात ओळख निर्माण झाली होती. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात सलग तीन वेळा आमदार होणे हे म्हणावे तेवढे सोपे नाही. हा एक विचारमंथनाचा भाग आहे.’ यावेळी माजी उपसरपंच धनाजी आसबे, उदय पवार, संभाजीराजे शिंदे (आंबे), दिलीप भोसले, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, संस्थेंअंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 hour ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

5 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

5 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

6 days ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

7 days ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

1 week ago