आमदार भारत भालके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पंढरपूर, दि. २८ : पंढरपूर-मंगळवेढा विधासभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (६० वर्षे) यांच्या पार्थिवावर सरकोली येथे आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामाम अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा भगिरथ भालके यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.
आमदार भारत भालके यांचे काल रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव आज दुपारी पंढरपूर येथे आणण्यात आले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे नागरिकांनी गर्दी केली होती. पंढरपूर येथे सरगम चौक, सावरकर चौक, शिवाजी चौक, प्रदक्षिणा मार्ग, कालिका देवी चौक यामार्गे त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. विठ्ठल सहकारी साखर कारखाना (गुरसाळे ता.पंढरपूर) व मंगळवेढा येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
सरकोली येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भालके यांना आदरांजली वाहिली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रशांत परिचारक, संजय शिंदे, यशवंत माने, प्राणिती शिंदे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार दीपक साळुंखे, नारायण पाटील, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, उदयसिंह भोसले, तहसिलदार वैशाली वाघमारे, स्वप्निल मरोड, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यासह सहकार, राजकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी पोलीसांच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…