गुजराती रूखी समाजातील विद्यार्थी यांना स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट
चंद्रभागा नदीला आलेल्या महापूराचे पाणी अचानक संतपेठ गुजराती कॉलनी येथे रात्रीच्या वेळी लोकांच्या घरांत शिरल्यामूळे तेथिल लोकांनी आपल्या घरातील सर्व वस्तु आहे.तशी सोडून सुरक्षीत ठिकाणी स्थालांतरीत झाले.अचानक आलेल्या पाण्यामूळे अफाट नूकसान झाले विद्यार्थीचे पुस्तके हि या पाण्यामुळे खराब झाली हि बातमी न्युज चॅनल च्या माध्यमातून प्रसिध्द झाल्या वर मूळचे पंढरपूर येथिल समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकत्ये कांतीलाल लाला सोलकी यांनी गुजराती रूखी समाजाचे अध्यक्ष गुरू दोडिया यांच्या सोबत चर्चा करून पूरामध्ये ज्या विद्यार्थी यांचे नूकसान झाले आहेत त्याना मी माइया ताकतीने होईल तेवढी मदत करणार असे आश्वासन दिले
त्या नूसार आज 26 नोव्हेबर संविधान दिनाचे औचित्य साधून
पंढरपूर गुजराती रूखी समाजातील विद्यार्थी यांना स्पर्धा परिक्षेची बहुमोल्य पुस्तके भेट दिली.
यावेळी कांतीलाल सोलंकी यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करताना समाजाचे उपाध्यक्ष यांनी सांगीतले कि कांतीलाल हे पंढरपूरात होते तेव्हा आपल्या समाजातील विद्यार्थी यांना स्वतःच्या घरा मध्ये विना मूल्य शिकवणी घेत.ते पंढरपूर नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात अधिकारी म्हणून सेवेत होते.पण त्या काळच्या अश्पृतेमूळे त्यांनी नोकरी सोडून ते मुंबईला गेले तेथे त्यांना रेल्वे मध्ये टि.सी.म्हणून नोकरी मिळाली
कांतीलाल सोलंकी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले गौरशाली काम केल्या बद्दल समाजाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
स्पर्धा परिक्षेत बसलेले विद्यार्थी दिपक दाऊत वाघेला व अजय भिमराव वाघेला यांना समाजाचे जेष्ठ रामा भिका सोलंकी यांच्या हस्ते पुस्तके देण्यात आली.
यावेळी गुरू दोडिया,काशीनाथ सोलंकी,दिनेश वाघेला,अनिल गोयल,महेश गोयल,प्रमोद वाघेला,मदन परमार,गमजी वाघेला,सतिश सोलंकी,आदित मेहडा,गंगाराम पुरबिया,अनिल परमार,छगन वाघेला,दाऊत वाघेला,राजू वाघेला उपस्थित होते
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…