मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरू

मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरू

नोंदीबाबत दावे व हरकती दि. 15 डिसेंबर, 2020 पर्यंत स्वीकारणार   

राज्यभरात मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम दि. 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला असून प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांची नाव नोंदणी आणि समाविष्ट नोंदींबाबत आक्षेप किंवा त्यामध्ये दुरूस्ती वा सुधारणा करावयाच्या असल्यास संबंधितांनी विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. तसेच दि. 5, 6, 12 आणि 13 डिसेंबर 2020 या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मोहीमदेखील आयोजित करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरात दि. 1 जानेवारी, 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक 17 नोव्हेंबर, 2020 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून प्रारुप मतदार यादीतील नोंदीबाबत दावे व हरकती दि. 15 डिसेंबर, 2020 पर्यंत स्वीकारण्यात येतील. ज्या पात्र मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नाहीत अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी संबंधित बाबीसाठीच्या विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

सर्व राज्यभरात या पुनरिक्षण कार्यक्रम कालावधीत शनिवार दि. 5 डिसेंबर तसेच रविवार दि. 6, शनिवार दि. 12 आणि रविवार दि. 13 डिसेंबर, 2020 रोजी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरिता त्याच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट- बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.

भारत निवडणूक आयोगाद्वारे www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची आणि यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेचाही उपयोग करावा. अधिक माहितीसाठी wwww.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन  करण्यात आले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

53 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago