अ.भा.महात्मा फुले समता गौरव पुरस्कार जाहीर! ना.छगनराव भुजबळ यांच्या हस्ते पुण्यात वितरण; चंद्रशेखर जाधव यांची माहिती

अ.भा.महात्मा फुले समता गौरव पुरस्कार जाहीर!

ना.छगनराव भुजबळ यांच्या हस्ते पुण्यात वितरण; चंद्रशेखर जाधव यांची माहिती

 पंढरपूर -आ.भा.महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली ता. पंढरपूर यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या समता गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुणे येथील महात्मा फुले वाडा, गंजपेठ येथे अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा समता परिषदेचे संस्थापक/अध्यक्ष ना.छगनराव भुजबळ यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती पंढरपूर तालुकाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी महामंडळचे माजी अध्यक्ष तथा समता परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी घाडगे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावर्षीचा कला क्षेत्रातील एक गाव तेरा भानगडी वेबसिरीज मधील चतुर भावड्या म्हणजे बाळासाहेब पाटील(विटा), सामाजिक पुरस्कार सद्दाम मणेरी, शैक्षणिक पुरस्कार सिंहगड इन्स्टिट्यूट पंढरपूरचे प्राचार्य कैलाश करांडे (सर), कृषी पुरस्कार भैरवनाथ बुरांडे,पत्रकारिता युवा पत्रकार संतोष रणदिवे (दै.तरुण भारत संवाद), साहित्य चंद्रकांत भुजबळ पुणे यांना समता गौरव पुरस्कार २०२० जाहीर करण्यात आले आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

1 week ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

3 weeks ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

4 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 month ago