पुणे पदवीधर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मतदार माझ्याच नावाला पसंती देतील:- डॉ निलकंठ खंदारे

पुणे पदवीधर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मतदार माझ्याच नावाला पसंती देतील:- डॉ निलकंठ खंदारे

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंगत होत आली असताना पदविधारांमध्ये मोठया प्रमाणात वैचारिक मंथन होत असून सोलापूर जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून माझ्याच नावाला जिल्ह्यात सर्वाधिक पसंती मिळेल असे मत पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार प्रा डॉ निलकंठ खंदारे यांनी व्यक्त केले.
डॉ खंदारे यांनी गेल्या एक वर्षांपासून जास्त काळ पदवीधर मतदार नोंदणी व्हावी म्हणून सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली होती त्यामुळे त्यांचे नाव आणि व्यक्तीत्व पदवीधरांना माहीत आहे. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक लाख पेक्षा जास्त मतदान नोंदणी केली आहे ही त्यांची जमेची बाजू आहे याउलट काही उमेदवार अचानक जागे होऊन अर्ज भरले असल्याने त्यांचा मतदारांशी संपर्क नाही.
डॉ निलकंठ खंदारे यांनी होम टू होम आणि सोशल मीडिया प्रचारादरम्यान पदविधरांची बेरोजगारी, शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हॉस्टेल च्या सोयीसह उभा करणे, विना अनुदानित शिक्षकांना अनुदान, नियमित पगार, फंड, ग्राच्युईटी, जुनी पेन्शन, प्राथमिक शिक्षकांच्या राजकीयिकरणाचा प्रश्न आणि अशैक्षणिक कामे कामाला विरोध यासह पदवीधर युवकांचे रोजच्या जीवन मरणाचे अनेक प्रश्न त्यांच्या वचन नाम्यात आहेत. इतर उमेदवार कोणताही ठोस अजेंडा नसलेले आहेत तर निलकंठ खंदारे यांच्याकडे वरील क्लिष्ट विषय सोडविण्याचा मास्टर प्लॅन आहे असे म्हणतात त्यामुळे या भूमीपुत्राच्या नावाला जिल्ह्यातून मोठी पसंती मिळत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

1 week ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

3 weeks ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

4 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 month ago