विठ्ठल हॉस्पिटल येथे कर्मवीर स्व.औदुंबरआण्णा पाटील यांची जयंती साजरी
। पंढरपूर, प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते, धवलक्रांतीचे जनक, श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन तसेच विठ्ठल हॉस्पिटलचे संस्थापक स्व.औदुंबर आण्णा पाटील यांची 97 वी जयंती विठ्ठल हॉस्पिटल येथे संपन्न झाली.
प्रारंभी कर्मवीर स्व.औदुंबर आण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब पाटील (देगावकर) यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी विठ्ठल हॉस्पिटलचे अध्यक्ष युवराजदादा पाटील, उपाध्यक्ष विलासराव साळुंखे, विठ्ठल हॉस्पिटलचे सर्व संचालक, अॅड. भारत भोसले, हारीदास घाडगे, प्रा.आर.डी.पवार, सुखदेव साळुंखे, रविंद्र पाटील, महेश परचडे, महिपती खरात, शिवाजी पवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीरआबा भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा विठ्ठल हॉस्पिटलचे अध्यक्ष युवराज (दादा) पाटील यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष विलास साळुंखे व प्राचार्य आर.डी.पवार यांची आपले विचार व्यक्त केले. सोशल डिस्टन्स पाळून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी औदुंबर अण्णा प्रेमी व हितचिंतक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…