मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरीच्या वारकऱ्यांना केले आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरीच्या वारकऱ्यांना केले आवाहन 

आषाढीला जसे सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करा !

मला राजकारण करायचे नाही. पण कोरोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की, पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे देखील उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. आजपासून ४ दिवसांनी मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण होतील. शूरवीर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कमांडोज यांनी प्राणपणाने अतिरेक्यांशी सामना केला. आजही आपण काही महिन्यांपासून या कोविड नावाच्या छुप्या दहशतवाद्याशी कडवा मुकाबला करतो आहोत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. उत्तर भारतीयांची छट पूजा झाली. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे, असे विनम्र आवाहन मी वारकरी बंधू भगिनींना करतो आहे.

महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही, पण सर्वांनी स्वयंशिस्त पाळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आज ते समाज माध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते.

यंदा दसऱ्याला शिवसेनेचा मेळावा देखील शिवतीर्थावर मोठेपणाने साजरा न करता साधेपणाने केला, मी आपला मुख्यमंत्री आहे त्यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान…’ असे असू नये म्हणून नियम माझ्यापासून काटेकोरपणे पाळले नाही तर तुम्हाला काही सांगायचा अधिकार नाही.  दिवाळीत फटाके वाजवू नका असे मी सांगितले आणि आपण माझे ऐकले आणि यंदा खूप कमी फटके उडाले. प्रत्येक गोष्टींसाठी कायदे करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात सेन्सर्सचे एम्बेडेड सिस्टिम्ससोबत एकत्रीकरण विषयावरील कार्यशाळा संपन्न

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय (कोर्टी, पंढरपूर) येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग व…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक अनिल बाबर यांना पीएचडी पदवी प्रदान

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथे आधुनिक नियंत्रण प्रणालीवरील आमंत्रित व्याख्यान संपन्न

दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन…

1 week ago

कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलमध्ये “आनंद बाजार दिवस” मोठ्या उत्साहात संपन्न

कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलमध्ये आनंद बाजार दिवस अत्यंत उत्साहात साजरा झाला. या बाजारामध्ये नर्सरी ते…

1 month ago

कर्मयोगी किड्स फाउंडेशन” स्कूलच्या विद्यार्थ्यांची माऊली फार्म हाऊस, भंडीशेगाव येथे शैक्षणिक भेट

दिनांक 12/01/2026 रोजी कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माऊली फार्म हाऊस, भंडीशेगाव येथे शैक्षणिक भेट…

1 month ago