डिसेंबर २०२१ मध्ये होणार पंढरपूर नगर पालिकेची निवडणूक
वार्ड निहाय नगरसेवक निवडणूक तर नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्ष निवड ?
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता सोलापूर जिल्ह्यातील नगर पालिका क्षेत्रातील जनतेला विशेषतः आजी आणि भावी नगरसेवकांना आता नगर पालिका निवडणुकांचे वेध लागले असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर २०१९ मध्ये होणाऱ्या नगर पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार व थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या फडणवीस सरकारच्या निर्णयास फाटा देत २०१९ मध्ये होणाऱ्या नगरसेवकांची निवडणूक पूर्वीप्रमाणेच छोट्या छोट्या वार्ड निहाय तर नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून करण्याचा अध्यादेश महाविकास आघाडी सरकारने फेब्रुवारी २०२० मध्ये काढला होता.व त्यास अर्थसंकल्पयीय अधिवेशनात विधिमंडळाची मंजुरीही घेतली होती.त्यामुळे बहुसदस्यीय व मोठ्या प्रमाणात मतदार संख्या असल्यामुळे सामान्य आर्थिक दृष्टया सक्षम नसलेल्या इच्छुकांवर अन्याय होतोय अशी भावना व्यक्त करणाऱ्या भावी नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला होता.कोरोनाचा प्रभाव ओसरत असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाने प्रस्तावित नगर पालिका निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून यानुसार पंढरपूर नगर पालिकेची निवडणूक डिसेंबर २०२१ मध्ये अपेक्षित धरली आहे.
पंढरपूर नगर पालिकेवर सध्या परिचारक प्रणित पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीची सत्ता असून २०१६ मध्ये झालेल्या नगर पालिका निवडणुकीत परिचारक गटाचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले होते तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष नेहतराव यांचा जवळपास ४ हजार मतांनी पराभव झाला होता.मात्र नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे युवराज पाटील,मुकुंद देवधर,आणि परिचारकांचे कट्टर समर्थक शिवाजी कोळी यांची उमेदवारी संतोष नेहतराव यांच्या दृष्टीने अडचणीची ठरली होती.
२०१६ मध्ये जेव्हा नगर परिषद निवडणूक झाली होती तेव्हा राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत होते.आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेस सत्तेत शिवसेनेसोबत सहभागी आहे.विधानसभा २०१९ निवडणुकीत आमदार भारत भालके याना शहरातून मताधिक्य मिळाले होते व २०११ प्रमाणे पुन्हा नगर पालिका ताब्यात घेण्यासाठी आमदार भालके समर्थक उत्सुक आहेत.तर आमदार प्रशांत परिचारक यांच्या पाठपुराव्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात पंढरपूर नगर परिषदेस मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी मिळाल्यामुळे शहरातील परिचारक समर्थकही ‘विकास’ विजयी करेल या आत्मविश्वासाने तयारीत आहेत.मात्र या साऱ्या घडामोडीत अनेक विकास कामांचा निकृष्ट दर्जाबाबत मात्र सामान्य नागरिक नाराज असल्याची दखल वेळीच घेतली गेली नसल्यामुळे व राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे परिचारक समर्थकांना मात्र निवडणुकीपूर्वी अधिक सक्रिय होत जनतेच्या भावना जाणून घ्याव्या लागणार आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…