आता रोज २ हजार भाविकांना होणार विठुरायाचे मुखदर्शन
ऑनलाईन नोंदणीसह नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार
शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करतच दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे राज्य शासनाने उघडण्यास परवानगी दिली आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज एक हजार भाविकांना दर्शनाकरिता सोडण्यात येत होते, आता दर्शनाकरिता दोन हजार भाविकांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद होती. मात्र नित्योपचार दैनंदिन सुरु राहिले. दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे भक्तांना दर्शनाकरीता खूली करण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंदिर समितीच्यावतीने श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा, श्री विठ्ठल सभामंड, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी, दर्शन रांग आदींची कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. मंदिरात व नामदेव पायरी ते दर्शन रांगेत स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर फवारण्यात येत आहे. दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाईल, याची खबरदारी घेण्यात येत आहे, त्याचबरोबर मंदिरात येणाऱ्या भाविकांकरीता सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासनाच्या निर्देशानुसार मंदिरात दर्शनाकरीता येणाऱ्या भाविक, भक्तांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता पासून भाविकांना दर्शनाकरीता सोडण्यात येत आहे.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या पास धारकांनाच दर्शनासाठी सोडण्यात येत असल्याने भाविकांनी http://www.
भाविकांसाठी नियमावली
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…