नांदोरे येथील साठ पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात  ‘डॉ.रोंगे सरांमुळे  ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाचे जाळे पसरले  -तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र वाघ

नांदोरे येथील साठ पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात
‘डॉ.रोंगे सरांमुळे  ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाचे जाळे पसरले -तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र वाघ
पंढरपूर- ‘शिक्षणतज्ञ डॉ.रोंगे सरांमुळे ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाचे जाळे पसरले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रगती झपाट्याने होत आहे. ’ असे प्रतिपादन तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र वाघ यांनी केले.
    नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने राज्यात थैमान घातल्याने सर्वत्र पाण्यामुळे हाहाकार उडाला होता. शेतीचे व पिकांचे दृष्य विदारक दिसत आहे. अशात स्वेरीचे डॉ. रोंगे सर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी नांदोरे (ता. पंढरपूर) येथे भेट देऊन सुमारे साठ पूरग्रस्त कुटुंबियांना आवश्यक अन्नधान्याचे वाटप केले. प्रास्ताविकात प्रा.सुनील भिंगारे यांनी डॉ.रोंगे सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची ओळख करून दिली व नांदोरेमध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. यावेळी डॉ. रोंगे म्हणाले की, ‘नांदोरे मधील नागरिक पुराच्या परिस्थितीला मागील काही दिवस धैर्याने टक्कर देत धीरोदात्तपणे जीवन जगत आहेत. खरंच त्यांच्या संयमाचे कौतुक करावेसे वाटते. या गावातील जागरूक नागरिकांशी चर्चा केल्यानंतर मदत करण्याचे ठरवले. आपणा सर्वांना सध्याच्या परिस्थितीला तोंड देत संकटावर मात करायची आहे. त्यामुळे धीर सोडू नका. येथील अवस्था पाहून छोटीशी मदत करावीशी वाटली तरी त्याचा आपण स्विकार करावा. तसेच सध्याची परिस्थती पाहता गरजू पूरग्रस्तांच्या पाल्यांना ‘कमवा व शिका’ योजनेतून स्वेरीमधील अभियांत्रिकी, फार्मसी व एम.बी.ए. या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.’ असे डॉ. रोंगे यांनी सांगितले. यावेळी नांदोरे मधील सुमारे साठ पूरग्रस्त कुटुंबीयांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळकर, माजी सरपंच भीमराव वाघ, माजी उपसरपंच हरिश्चन्द्र भिंगारे, विलास सातुरे,  अनिल भिंगारे, रामचंद्र भिंगारे, विठ्ठल भिंगारे, मोहन साळुंखे, प्रशांत साळुंखे, पांडुरंग नाईकनवरे यांच्यासह नांदोरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

6 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago