सुशिलकुमार शिंदे साहेबांनी केली गोरगरीबांची दिवाळी गोड
मोहोळ तालुक्यातील चार गावांमध्ये दिवाळीनिमित्त केले साखरेचे वाटप
पंढरपूर -कोरोना महामारी, त्यानंतर परतीच्या पावसामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांसह व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. यामुळे आधीच खायचे वांदे त्यात दिवाळी कशी करायची असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिलेला असताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांनी नागरिकांना दिलासा देण्याचे काम केलेले असून आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील चार गावातील नागरिकांना दिवाळीनिमित्त साखरेचे वाटप करण्यात आले. याचा शुभारंभ सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्याहस्ते मोहोळ तालुक्यातील प्रसिध्द असणाऱ्या नागनाथ देवस्थानचे वडवळ या गावात करण्यात आला. ऐन दिवाळीनिमित्त साखरेचे वाटप करून सर्वसामान्यांची दिवाळी गोड केली म्हणून अनेकांतून सुशिलकुमार शिंदे साहेबांचे आभार मानण्यात येत आहेत.
यावेळी नागनाथ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपुजे महाराज, जिल्हा सरचिटणीस किशोर पवार, मोहोळ तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, मोहोळ कार्याध्यक्ष सुरेश शिवपुजे महाराज, बिरासाहेब खरात, ज्ञानेश्वर कदम, लक्ष्मण गजघाटे, नानासाहेब घोलप, नानासाहेब मोरे, माऊली सोलंकर, ज्ञानदेव खांडेकर, देविदास लेंगरे आदि युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील प्रसिध्द असणाऱ्या नागनाथ देवस्थानचे वडवळ येथे शुभारंभ करून ढोकबाभुळगाव, नजिकपिंपरी, गोटेवाडी या चार गावांतील सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीनिमित्त साखरेचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मदतीचा हात देत असतात. सुशिलकुमार शिंदे साहेबांचे या भागाशी एक वेगळे नाते जोडलेले आहे. ते ऋणानुबंध जपण्याचे काम आजपर्यंत साहेबांनी केलेले आहे व अडचणीत आलेल्या सर्वांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शिंदे साहेब सदैव कटिबध्द आहेत आज ही दिवाळीनिमित्त साखरेचे वाटप करून त्यांनी अडचणीत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याचे काम केलेले आहे.
चौकट-
वडवळ येथे पाण्याचे जार दिले भेट
मोहोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र वडवळ या ठिकाणी नागनाथांचे दर्शन घेण्यासाठी अमावस्या निमित्त सुमारे 1 ते दीड लाख भाविक येत असतात.या ठिकाणी आल्यानंतर त्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 4 पाण्याचे जार भेट देण्यात आले आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिलेली आहे.