युटोपियन कारखान्याकडून 200 रुपये प्रति टन दिवाळी भेट
कामगारांना ही बोनस 16.66 टक्के बोनस
युटोपियन शुगर्स लि. पंतनगर कचरेवाडी या कारखान्याने या पूर्वीच ऊस उत्पादकांना दिवाळी भेट देण्याचे जाहीर केल्याप्रमाणे गळीत हंगाम २०१९-२० या कालावधीत गाळप केलेल्या ऊसास प्रति मे. टन २०० रु. प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली असल्याची व कामगारांचीही दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कामगारांनाही १६.६६% बोनस म्हणून दिला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली.
यावेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले कि,युटोपियन शुगर्स ने गळीत हंगाम २०१९-२० मध्ये ४,०३,२३२ मे. टन इतक्या ऊसाचे गाळप करीत ९.९१% इतक्या सरासरी रिकव्हरी ने ३,९९,५००क्विं.इतकी साखर उत्पादित केली आहे. चालू वर्षी ऊस उत्पादकांकडे पुरेशा प्रमाणावर ऊस आहे. मात्र कारखाना प्रशासनावर विश्वास टाकून ज्या ऊस उत्पादकांनी २०१९-२० या गळीत हंगामामध्ये युटोपियन शुगर्स ला ऊस दिला आहे त्या सर्व ऊस उत्पादकांना दिवाळी भेट देणार असल्याचे कारखाना प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले होते,त्यास अनुसरून शब्द्पूर्ती करीत ऊस उत्पादकांना प्रति मे.टन २०० प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे.
दिवाळीच्या तोंडावरती सदर ची रक्कम मिळत असल्याने ऊस उत्पादकांमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या ऊस उत्पादकांना दिवाळीची साखर हि घरपोच देण्यात येणार असल्याचे सांगून शेती विभागा मार्फत सदर च्या साखरेचे वाटप चालू करण्यात आले आहे.कारखान्याच्या उभारणी मध्ये कामगारांचे ही योगदान तितकेच महत्वाचे आहे कामगारांची जिद्द,चिकाटी,व सकारात्मक दृष्टीकोण या बाबी कारखान्याच्या प्रगती मध्ये हातभार लावणार्या असतात. त्यामुळे त्यांची ही दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कामगारांना ही १६.६६% प्रमाणे बोनस देण्यात आला असल्याची माहिती ही चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली.तसेच त्यांनी ऊस उत्पादक,कर्मचारी, व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या प्रसंगी कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी वर्ग उपस्थित होता.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…