स्वेरीच्या चार विद्यार्थींनीची सान्की सोल्युशन कंपनीत निवड

स्वेरीच्या चार विद्यार्थींनीची सान्की सोल्युशन कंपनीत निवड
पंढरपूरः- ‘सान्की सोल्युशन’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थींनीची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
        पुणे येथील  ‘सान्की सोल्युशन’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून  रत्नप्रभा मोरे, विद्या मोरे, अपूर्वा मोहिते व श्रद्धा दसाडे या चार विद्यार्थींनीची निवड केली. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात ? याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे व प्रा.एस.व्ही. दर्शने आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या या चारही विद्यार्थींनीचे अभिनंदन केले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…

5 days ago

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा डंका; सानिकाला ९ लाखांचे पॅकेज

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…

7 days ago

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…

1 week ago

स्थापत्य अभियांत्रिकी विभागात व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या प्रा. बाबर व प्रा. लंबे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…

2 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड वार्षिक ५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…

2 weeks ago