आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची नासधूस
महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी
(पंढरपूर प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व्यायामशाळेनजीक असलेल्या डिजिटल बोर्डवरील प्रतिमा फाडून नासधूस करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची निंदणीय घटना घडली असून सदर प्रकरणातील कुप्रवृत्तींचा शोध घेऊन त्वरित गुन्हा दाखल करावा. अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती देताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री उशिरा सदर प्रतिमेची विटंबना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती 8 नोव्हेंबर रोजी असून महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने प्रतिवर्षी हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.या उत्सवाची तयारी सुरू असतानाच सदर गंभीर प्रकार घडला असल्याने महादेव कोळी समाजबांधवात संतापाची लाट उसळली आहे.
या राज्यात आदिवासी सुरक्षित नाहीत आणि आदिवासींचे महापुरुषही सुरक्षित नाहीत हे या घटनेमुळे दिसून आले आहे. या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आले असून त्वरित कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी महादेव कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…