महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या सोलापूर ग्रामीण अध्यक्षपदी गिरीराज लांडगे याची निवड
तर पंढरपूर शहराध्यक्ष पदी विजय माने
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेच्या सोलापूर जिल्हयातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असून या संघटनेच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पंढरपूर येथील गिरीराज लांडगे याची तर पंढरपूर शहराध्यक्षपदी विजय माने यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यात पोलीस कर्मचारी संघटनेस प्रतीबंध असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या न्यायहक्कासाठी संघटितपणे लढा देता येत नाही.विविध अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत देखील संघटितपणे पाठपुरावा करता येत नाही.मात्र या साऱ्या घटनाक्रमात पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटूंबीयांनाही मोठ्या अडचणींचा,समस्यांचा सामना करावा लागतो.वेळोवेळी होणारी बदली,अस्थिर वातावरण,कर्तव्याच्या वेळेबाबत अनिश्चितता याचा सामना जसा पोलीस कर्मचाऱ्यांना करावा लागतो तसाच तो पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांनाही करावा लागतो.आणि याच मुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या पोलीस बॉईज संघटनेच्या काम विस्तारत गेले.
नव्याने विविध पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या निवडीने संघटनेत उत्साह संचारला असून भविष्यात जिल्ह्यात पोलीस कुटूंबियांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी आशा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…