पंढरपुरातील वैभव ऑईलमिलवर अन्न विभागाची कारवाई
६५९ किलोचा तेलसाठा जप्त
पंढरपुरातील नामांकित मे. वैभव ऑईल मिलच्या ठिकाणी अन्नविभागाने कारवाई केली असून या ठिकाणी अभिरुची या नावाने सरकी तेल रिपॅक करण्याचा व्यवसाय चालू असल्याचे दिसून आले. अधिक तपासणी केली असता पेढीत अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार आवश्यक तंत्रज्ञ नसल्याचे तसेच उत्पादित केले जाणारे तेल वेळोवेळी तपासून न घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे पेढीत उपलब्ध असलेला खाद्यतेलाचा साठा एकूण ६५९ किलो एकूण किंमत ७९०८० जप्ती पंचनामा करून सील करून ठेवण्यात आला आहे.
या कारवाईची पंढरपूर शहरात जोरदार चर्चा होताना दिसून येत असून ऐन दिवाळीच्या तोंडावर लोकांची जीवनावश्यक वस्तुंची खरेदीची लगबग सुरु असताना शहरात खाद्य तेल व्यवसायात दबदबा असलेल्या वैभव ऑइल मिलमध्येच अन्न विभागाने ठरवून दिलेल्या मानांकाचे पालन केले जात नसल्याचे आदळून आल्याने हि कारवाई करण्यात आलेली आहे. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त श्री. सुरेश देशमुख यांनी केले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…