एमएचटी-सीईटी २०२० परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्याना शासनाकडून आणखी एक संधी शनिवार दि. ०७ नोव्हेंबर २०२० रोजी होणार परीक्षा स्वेरीचे सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांची माहिती

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्याना शासनाकडून आणखी एक संधी

शनिवार दि. ०७ नोव्हेंबर २०२० रोजी होणार परीक्षा

स्वेरीचे सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांची माहिती

पंढरपूर- ‘अचानक आलेला पाऊस त्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती, सोबतच कोरोना महामारी या व अन्य कारणामुळे काही ठिकाणची वाहतूक व्यवस्था खोळांबली होती. अशातच दि. ०१ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत एमएचटी-सीईटी २०२० परीक्षा संपन्न झाली परंतु या कालावधीत ही परीक्षा अनेक कारणांमुळे न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना शासनाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार या परीक्षेच्या ‘अॅडीशनल सेशन’ साठी यशस्वीपणे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवार, दि. ०७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी पीसीबी (बायोलॉजी) आणि दुपारी पीसीएम (मॅथ्स) अशा दोन सत्रात घेतली जाणार आहे.’ अशी माहिती गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

          ज्या विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे एमएचटी-सीईटीची परीक्षा नियोजित वेळेत देता आली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सामायिक परीक्षा कक्षाने ‘अॅडीशनल सेशन’ ची संधी दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ‘अॅडीशनल सेशन’ साठी शंभर रुपये ऑनलाईन भरून रजिस्ट्रेशन केले आहे, अशा विद्यार्थ्यांची येत्या शनिवारी, दि. ०७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० पर्यंत पीसीबी (बायोलॉजी) तर दुपारी ०२.३० ते ०५.३० पर्यंत पीसीएम (मॅथ्स) ग्रूपची परीक्षा घेतली जाणार आहे. या ‘अॅडीशनल सेशन’साठी रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी आपले  अॅडमीट कार्ड  मंगळवार दि. ०३ नोव्हेंबर २०२० पासून डाऊनलोड करून शकतात. सदर अॅडमीट कार्ड वर परीक्षेचे केंद्र, रिपोर्टींग टाईम, दिवस आणि तारीख यांची सविस्तर माहिती दिलेली असेल. त्यासाठी विद्यार्थांनी स्टेट सीईटी सेलच्या संकेतस्थळाला (लिंक-https://mhtcet2020.mahaonline.gov.in.) भेट द्यावी. असे आवाहन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago