सणानिमित्त दुकानात गर्दी होणार नाही याची व्यापाऱ्यांनी दक्षता घ्यावी: प्रांताधिकारी ढोले

  सणानिमित्त दुकानात गर्दी होणार नाही याची व्यापाऱ्यांनी दक्षता घ्यावी: प्रांताधिकारी ढोले 

 

पंढरपूर  :  दिवाळी सण जवळ आल्याने खरेदीसाठी दुकानात नागरिकांची मोठयाप्रमाणात गर्दी होत आहे. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व्यापाऱ्यांनी  पालन करावे. तसेच  दुकानात  गर्दी होणार याची दक्षता घेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना  प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या

दिवाळी सणानिमित्त कोरोनाचा संसर्ग वाढु नये यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजने बाबत प्रांताधिकारी कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, पोलीस निरिक्षक अरुण पवार तसेच शहरातील व्यापारी  व व्यापारी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रांताधिकारी ढोले म्हणाले, दिवाळी सणानिमित्त  विविध वस्तू खरेदीसाठी  दुकानात गर्दी होत असल्याने. व्यापाऱ्यांनी आवश्यकती काळजी घ्यावी. दुकानात काम करणारे कामगारांनी मास्कचा वापर करावा तसेच त्यांची  वेळोवळी आरोग्य तपासणी करावी. येणाऱ्या ग्राहकास सुरक्षित अंतर ठेवून वस्तूची देवाण घेवाण करावी. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे. मास्क लावले नसेल तर दुकान प्रवेश देऊ नये.  शक्यतो ग्राहकांना माल घरपोच मिळेल याबाबत नियोजन करावे.असेही श्री ढोले यांनी सांगितले.

हिवाळ्याच्या वातावरणात मोठ्याप्रमाणात हवेचे प्रदुषण होत असते. नागरिकांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करावी.   फटाक्यामुळे ध्वनीप्रदुषण व वायुप्रदुषण होऊन लहान मुले, जेष्ठ तसेच श्वसनाचा आजार असणाऱ्या नागरिकांना यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. यासाठी नागरिकांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करावी असे आवाहनही श्री ढोले यांनी यावेळी केले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी  व्यापाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांबरोबच परिसरातील साखर कारखाने सुरु झाल्याने ऊसतोड कामगारांचीही गर्दी वाढत आहे.  दुकानात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्राहकांना शक्यतो घरपोच माल द्यावा यासाठी व्हॉस्टॲप व इतर इंटरनेट सुविधेचा वापर करावा. जे दुकानदार प्रशानाच्या सुचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

दिवाळी सणानिमित्त बाजारपेठतील व इतर ठिकाणी माल वाहतुकीसाठी अवजड वाहनांना सकाळी अर्धातास व दुपारी अर्धातास असा एक तासाचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. दिवाळी सणानिमित्त  सुधारीत वेळेनुसार  सकाळी 11.30  ते दुपारी 4.30 पर्यंतची अवजड वाहनांना वेळ देण्यात आली आहे. यावेळेतच व्यापाऱ्यांनी आपल्या वस्तुंचा चढ-उतार करावा. तसेच या वाहनांमुळे वाहुकीस अडथळा येवून वाहतुक कोंडी  होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना श्री.कदम यांनी यावेळी दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 weeks ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 weeks ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago