मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी,
सुरू केला पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा
पंढरपूर: प्रतिनिधी
सध्या कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांनी मागील आठ महिन्यापासून सामाजिक बांधिलकी जपत आपल्या परीने विविध गरजू लोकांना अत्यावश्यक गरज भागविण्यासाठी पुढाकार घेतला होता, तर कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांचं बचतगट कर्ज माफ करून मिळावे यासाठीही राज्यभर म
मोर्चे काढले आहेत. तर आता मागील काही दिवसांपूर्वी अनेक लोक परग्रस्त होऊन अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनी या घटकापर्यंत पोहचून अडचणी समजून घेण्यासाठी दौरा सुरू केला आहे.
वरील दौऱ्याचाच एक भाग म्हणून दिलीप धोत्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिरढोन तालुका पंढरपूर
या पूरग्रस्त गावाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या,या प्रसंगीअनेक
माता भगिनींनी अडीअडचणी सांगितल्या. यावेळी सरपंच सौ मीनाक्षी गणेश भुसणर,माजी सरपंच दत्ता कांबळे, गणेश भुसणर,माजी सरपंच अण्णासाहेब भुसणर,सुसेन भुसणर इत्यादी उपस्थित होते*
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…