स्वेरीच्या डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या स्वास्थासाठी पिराची कुरोलीमध्ये दुग्धाभिषेक संपन्न
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांची प्रकृती उत्तम रहावी या हेतूने पिराची कुरोली (ता. पंढरपूर) मधील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमान मंदिरात नुकताच दुग्धाभिषेक करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून भविष्य घडविण्यात मोलाचा वाटा उचलणारे स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे हे नुकतेच कोविडची चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आले असून त्यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे आणि संपर्कातील व्यक्तींना चाचणी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे पाहून डॉ. रोंगे सरांची प्रकृती पूर्ववत ठणठणीत होण्यासाठी मंदिराचे पुजारी राजेंद्र सुतार यांच्या हस्ते पिराची कुरोली येथील अनेक कार्यकर्ते व डॉ.रोंगे सर प्रेमींनी हनुमान मूर्तीची विधिवत पूजा करून मूर्तीला दुग्धाभिषेक घातला आणि डॉ. रोंगे सरांना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना केली. यावेळी गणेश कौलगे, बळीराम लामकाने, धनंजय कौलगे, बाळकृष्ण कौलगे, मुन्ना मुजावर यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…