लायन्स संस्थेच्या वतीने बोधले,परदेशी व आशा ताई यांना कोव्हीड योद्धा पुरस्कार
पंढरपूर तालुक्याला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला.
लॉकडाउन कालावधीमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले, आरोग्य सभापती विवेक परदेशी यांच्यासह पंढरपूरातील सर्व आशा कर्मचारी यांना उल्लेखनीय काम केल्याबद्दल व करत असल्याबद्दल लायन्स संस्थेच्यावतीने कोव्हीड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांचा सन्मान लायन्स अध्यक्ष सुजाता गुंडेवार यांनी केला. आरोग्य सभापती विवेक परदेशी यांचा सन्मान ईनरव्हील संस्थेच्या संस्थापिका नगीना बोहरी यांनी केला. सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर होते.
तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य सभापती यांनी कोरोना रोखण्यासाठी विविध योजना तयार केल्या. प्रशासन, लोकप्रतिनिधी नागरिक यांच्या बरोबर विचार विनिमय करुन, समन्वय साधुन, सर्व घटकांशी संवाद आणि नियोजन आखुन कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.कोरोना बरोबरच, साथीचे आजार विषेशतः डेंग्यू याची जनजागृती व उपाययोजना केली. नागरिकांच्या मनातील भिती कमी करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या उपाययोजना केल्या. आरोग्य सेवेचे कर्तव्य बजावत असताना डॉक्टर बोधले व आरोग्य सभापती परदेशी यांना कोरोनाची बाधा झाली स्कॉरंटाइन कालावधीत दोघांनीही फोन वरून आपले कर्तव्य बजावले कोरोनामुक्त झाल्यावर परत जोमाने कामास सुरुवात केली. या सेवेची दखल घेऊन त्यांना कोव्हीड योद्धा पुरस्कार देउन गौरवण्यात आले.
आशा स्वयंसेविका अपेक्षा कुलकर्णी (गटप्रवर्तक),तृप्ती परांडकर, राजश्री चव्हाण, आशा ठोकळे,आश्विनी सर्वगोड, सवीता डोके , शैला ढोबळे, निता सलगर, ज्योती हरीदास, वर्षा परबत, वंढना कटप, ज्योती बोधे, अमृता कटप, स्वाती कटप, भाग्यश्री सर्वगोड, दुर्गा मोहिते, रेशमा अभंगराव, प्रियांका सर्वगोड ,वैशाली कुचेकर, उल्फा लोंडसे, वैशाली धारेकर, स्वाती सुरवसे, मीनल ढावरे, साईश्री ढवळे,अश्विनी संगीतराव, आश्विनी वाडकर, रुपाली थिटे, सुवर्णा सुरवसे, उमा ईंगोले, रंजना ईंगोले, शितल घोडके, मनीषा बाबर, माधुरी सर्वगोड, कोमल बाबर, ज्योती अंकुशराव, सुवर्णा माने, मनिषा महामुनी, लतिफा बागवान, रामेश्वरी जाधव यांना नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, डॉ प्रदिप केचे, डॉ प्रसन्न भातलवंडे, लायन्स संस्थेचे सदस्य व मान्यवरांच्या हस्ते कोव्हीड योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला.
आशा ताई यांनी कोरोनाच्या कालावधी मध्ये सुरवाती पासुन आज पर्यंत प्रशासनाच्या सुचने प्रमाने घरोघरी जाउन नागरिकांची तपासणी केली. नागरिकांना कोरोना विषयी माहीती दिली. जेष्ठ नागरिक विषेशतः ज्यांना मधुमेह, रक्तदाब, किडनी, लिव्हर दमा व इतर गंभीर आजार/ तसेच गरोदर माता ,स्तनदा माता,५वर्षापर्यंतची लहान बालके यांची माहिती वाॅर्डनिहाय घेवुन प्रतिबंधात्मक उपाय योजनाबद्दल माहिती सांगुन वेळोवेळी रुग्ण संदर्भित करण्याचे काम केले. या सर्व कामा बद्दल आशा कर्मचारी यांना कोव्हीड योद्धा म्हणुन गौरवण्यात आले.
पंढरपूरातील बांधकाम व्यावसायिक श्री.शार्दूल नलबिलवार यांनी कोविडच्या अतिशय कठीण परिस्थितीमधे ज्या ठिकाणाहून मागणी होईल त्या ठिकाणी धान्य दिले, औषधे पुरवली व आर्थिक मदतही केली. स्वतः व सर्व कुटुंबीयांना कोरोनातून बाहेर काढले याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
शहरांमध्ये आरोग्य सभापती यांनी नुसते कार्यालयात बसून नियोजन न करता कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या सोबत फिल्डवर राहून ही काम केले. ज्या वेळी बाहेर पडायला लोक घाबरायचे त्यावेळी त्यांनी फिल्ड वर काम करून सर्वांना प्रोत्साहन दिले. पुर कालावधीत व नंतर स्वच्छता व निजंतुकिकरणावर भर दिला, नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.
तसेच कोव्हीड वॉरियर, आशा कर्मचारी, नगरपालिकेतील कर्मचारी, सफाई कर्मचारी, प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार कंटेमेंट झोनमध्ये, आपल्या प्रभागामध्ये प्रतिकार शक्ती वाढवणारे अर्सेनीक अल्बम ३० होमिओपॅथिक औषध स्वखर्चाने दिले. कोरोनाच्या सुरवातीला नगरपालिकेच्या दवाखान्यात स्वखर्चाने पिपीई किट उपलब्ध करुन दिले. निर्जंतुकीकरणाचे काम जलद व्हावे यासाठी नगरपरिषदेला स्वखर्चाने इलेक्ट्रॉनिक हँड पंप उपलब्ध करुन दिले. ज्या लोकांनी मदत मागितली त्यांना तळमळीने ती पुर्ण करण्याचा प्रयत्न आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला.ललिता कोळवले यांनी केले तर अध्यक्ष सुजाता गुंडेवार यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास लायन अध्यक्षा ला.डॉ.सुजाता गुंडेवार, लायनेस अध्यक्षा ला.डॉ.पल्लवी माने, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट, डॉ प्रदिप केचे,डॉ प्रसन्न भातलवंडे, ला.विवेक गुंडेवार, ला.रा.पां.कटेकर, ला.कैलास करंडे, इनरव्हील संस्थेच्या संस्थापिका मा.नगीना बोहरी, वैशाली काशिद हे मान्यवर उपस्थित होते.