पंढरपूर शहरातील तीन हातभट्टी दारू विक्रेत्यांवर शहर पोलिसांची कारवाई
तिघांविरोधात गुन्हा दाखल
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक पदाची तेजस्विनी सातपुते यांनी सूत्रे घेतल्यानंतर संपूर्ण सोलापूर ग्रामीण अधिक्षक कार्यक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाया होत असल्याचे आढळून येते.वाळू चोरी,अवैध दारू विक्री यामुळे पंढरपूर तालुक्यात पोलीस प्रशासनाकडे सामान्य जनता कायम बोट दाखवीत आलेली असतानाच गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत अवैध दारू विक्री व वाळू उपसा यावर पंढरपूर उपविभागीय पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात कारवाया करून गुन्हे दाखल करण्यात आल्याचे दिसून येते.विशेषतः करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारू विक्री व देशी विदेशी दारूची विक्रीवर सर्वाधिक कारवाया करण्यात आल्याचेही दिसून आले.सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी अवैध व्यवसायावर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पंढरपूर शहर पोलीस ठाण्या अंतर्गत आज पंढरपूर शहरात एकाच दिवशी ३ ठिकाणी हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
पंढरपूर शहरातील अनिल नगर येथे एका घराचे आडोश्याला चोरून हाभ दारू विक्री करीत असलेल्या उषा धर्मा कोळी, जुनी पेठ येथे हातभट्टी दारू विक्री करीत असलेल्या भैरू दगडू वाघमोरे,ज्ञानेश्वरनगर येथे हातभट्टी दारू विक्री करीत असलेल्या सुधीर गोरख धोञे यांच्या विरोधात महा. प्रोव्ही. अँक्ट कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या सुचनेनुसार करण्यात आलेल्या या कारवाईत सदर प्रकरणातील फिर्यादी पो.काँ. संजय उध्दव गुटाळ यांच्यासह पोहेकाँ/ढेरे,पो. ना. पवार,पो. ना/ पठाण,पो. ना/चंदनशिवे,पो. हे. काँ. उबाळे,पो. ना/. पठाण,पो. ना. कांबळे,पो. काँ मोरे ,पो. ना. पाटील,पो. ना. पठाण,पो. ना/शेख, पो काँ घुमरे यांनी भाग घेतला.