इनरव्हील कब ऑफ पंढरपूर यांचे वतीने पद्मावती मंदिरास लोखंडी रेलींग भेट
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे परीवार देवता श्री पद्मावती देवी मंदिर येथील पायऱ्या
खड्या असलेने भाविकांना चडण्यास व उतरण्यास त्रास होत होता. नवरात्रौत्सवामध्ये महिलांची गर्दी
विचारात घेता इनरव्हील कब ऑफ पंढरपूर यांचे वतीने बाजुला व मध्यभागी लोखंडी रेलींग भेट
स्वरूपात स्व-खर्चाने बनवून व बसवून देण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा श्रीमती शकुंतला
नडगीरे, सदस्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांचे शुभहस्ते आज रोजी संपन्न झाला.
इनरव्हील कब ऑफ पंढरपूर अध्यक्षा सौ शहमीका केसकर, सेक्रेटरी सौ वैशाली काशीद व
प्रकल्प सल्लागार सौ आशा मर्दा यांचा सत्कार मंदिरे समिती सदस्या श्रीमती शकुंतला नडगीरे व सदस्य
ह.भ.प. श्री ज्ञानेधवर महाराज जळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी इनरव्हील कब ऑफ
पंढरपूर पदाधिकारी नगीना बोहरी, डॉ वर्षा काणे, सुजाता यादगिरी, अनुराधा हरिदास, ज्योती
कुलकर्णी, मंदिरे समिती कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड, व
मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…