महर्षी वाल्मिकी संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील म्हेत्रे यांची निवड
पंढरपूर (प्रतिनिधी):- महर्षी वाल्मिकी संघ या रजिस्टर्ड सामाजिक संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी इसबावी, पंढरपूर येथील सुनील मारुती म्हेत्रे यांची निवड करण्यात आली आहे. आदिवासी कोळी महादेव समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी कार्यरत असलेल्या महर्षी वाल्मिकी संघ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशरवा यांनी सुनील म्हेत्रे यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांची नियुक्ती केली आहे. नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने आजतागायत विविध सामाजिक कार्यात आघाडी घेतलेली आहे. विशेषत: या संघटनेच्या माध्यमातुन झालेली प्रमुख कार्या पुढील प्रमाणे आहेत. पंढरपूर येथील तीन रस्ता चौक या सर्वात मोठ्या चौकास महर्षी वाल्मिकी हे नांव दिले, पंढरीतील चंद्रभागेवरील मोठया पुलाला महर्षी वाल्मिी सेतु हे नाव दिले, नगरपरिषदेकडून 28 गुंठे जागा समाज मंदिरास घेतली व या जागेस वाल्मिकी भवन हे नाव देवुन येथे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायामशाळा ही तालीम सुरु करुन आखाडा सुरु केला. चंद्रभागेमध्ये आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांना अटक झालेली जागा शोधुन येथे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे स्मारक उभारणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असुन यास शासन मंजुरी मिळाली आहे. आदिवासी विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय शिष्यवृती सुरु होणेचे मागणीसाठी आंदोलन करुन ही शिष्यवृत्ती सुरु करुन घेतली. याचा लाभ आज हजारो आदिवासी विद्यार्थी घेत आहेत. आषाढी वारी मध्ये मुख्यमंत्र्यांसमोर महादेव कोळी जमातीच्या दाखल्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. यास यश मिळाले असुन अनेकांना जातीचे दाखले मिळाले आहेत. सामुदायीक विवाह सोहळे, सर्व महापुरुषांच्या जयंत्या, कोरोना, महापुर आदी संकटकाळात उल्लेखनीय कार्य, कोळी महादेव जमातीच्या दाखल्याचा प्रश्न व नोकर्यांचा प्रश्न गेल्या 10-15 वर्षापासुन ऐरणीवर ठेवला व यासाठी वारंवार विविध प्रकारची यशस्वी आंदोलने केली. लाखो ववारकर्यांचे तिर्थस्थान चंद्रभागा नदी प्रदुषण विरहीत व स्वच्छ ठेवण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. दुर्बल, वंचीत, शोषीत पिडीत, मतीमंद , निर्वासीत , बेवारस, अपंग यांचेसाठी उल्लेखणीय कार्य.महर्षी वाल्मिकी संघाने केलेले आहे.
अशा अनेक भरीव समााजिक कार्यात सक्रीय असलेल्या महर्षी वाल्मिकी संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल वरिष्ठांचे व संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन व संघटनेच्या ध्येय धोरणानुसार संघटनेच्या विविध कार्यात सक्रीयपणे सहभागी होईल. असे मत यावेळी नुतन जिल्हा उपाध्यक्ष सुनील म्हेत्रे यांनी व्यक्त केले. यावेळी गणेश अंकुशराव, राहुल परचंडे, संदीप घंटे, निलेश माने,सुरज कांबळे, संपत सर्जे, नितेश म्हेत्रे, अक्षय म्हेत्रे्र, स्वप्नील गायकवाड, प्रज्योत देशमुख, महेश सेवान, संकेत गायकवाड, अभिजीत बेसुळके, मुबीन तांबोळी, विश्वजीत करपे, करण पंगुडवाले, प्रकाश मगर, आदित्य जाधव रंजीत लवटे, निखील धनवडे, गणेश जवारे, सुहास डुरे-पाटील, मुन्ना म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्र आदी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…