पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कारवाईत मोबाईल आणि दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कारवाईत मोबाईल आणि दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

१० मोटारसायकल व १३ मोबाईल जप्त 

 

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९५/२०२० नुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनुसार आकाश फिरंगीनाथ बामणे रा.जुनी पेठ या तरुणास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासमवेत पंढरपूर शहरासह सांगली,सातारा,इंदापूर येथून मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले.या आरोपीकडून चोरीच्या १३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.या आरोपीचा एक साधीदार फरार असून त्यास अटक करून आणखी गुन्हे उघकीस आणण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखा प्रयत्नशील आहे.     

          या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि नवनाथ गायकवाड,पोहेकॉ सुजित उबाळे,पोहेकॉ बिपीनचंद्र ढेरे,पोहेकॉ सूरज हेंबाडे, पो ना गणेश पवार,पो ना. सतीश चंदनशिवे,पो ना. मछिंद्र राजगे, पो. ना. इरफान शेख,पो ना. अभिजित कांबळे,पो ना. शोएब पठाण,पो ना. प्रसाद औटी,पो. ना. संदीप पाटील,पो. कॉ .सिद्धनाथ मोरे, पो. कॉ.संजय गुटाळ,पो. कॉ.समाधान माने यांनी  सहभाग घेतला.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक गणेश पवार हे करीत आहेत.                               

तर गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या दुसऱ्या कारवाईत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजि नं.६४०/२०२० नुसार मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या तपासात तसेच चोरीस गेलेल्या मोबाईलच्या लोकेशनची माहिती मिळताच जाग्यावर जाऊन सापळा रचून आरोपीस गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पकडले.सदर आरोपीकडे अधिक चौकशी करता आरोपी नामे १) अहमद नजीर सययद,रा.कुर्डुवाडी ता.माढा,२) शाहिदा महादेव तुपे रा.पाणवन ता. मान जिल्हा सातारा ३) भोजलींग महादेव तुपे रा.पाणवन ता. मान जिल्हा सातारा यांनी सदर गुन्हा कबूल असून घरझडतीत ३ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत तर इतर १२ मोबाईल गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी हस्तगत केले आहेत.   

   जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या आदेशावरून व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि नवनाथ गायकवाड,पोहेकॉ सुजित उबाळे,पोहेकॉ बिपीनचंद्र ढेरे,पोहेकॉ सूरज हेंबाडे, पो ना गणेश पवार,पो ना. सतीश चंदनशिवे,पो ना. मछिंद्र राजगे, पो. ना. इरफान शेख,पो ना. अभिजित कांबळे,पो ना. शोएब पठाण,पो ना. प्रसाद औटी,पो. ना. संदीप पाटील,पो. कॉ .सिद्धनाथ मोरे,पो. कॉ.संजय गुटाळ,पो. कॉ.समाधान माने,पो. कॉ.समाधान माने,पो. कॉ.अन्वर आतार,म.पो. ना.भाग्यश्री घाडगे,म.पो. ना. सविता भोजने यांनी सहभाग घेतला.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक अभिजित कांबळे करीत आहेत.     

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago