केद्रींय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली उद्धवघाट दुर्घटनाग्रस्त कुटूंबाची सात्वनपर भेट

केद्रींय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली उद्धवघाट दुर्घटनाग्रस्त कुटूंबाची सात्वनपर भेट

शासकीय मदतीसाठी पाठपुरावा करू -ना.आठवले

अतिवृष्टीमुळे  चंद्रभागा नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटावरील कोसळलेल्या संरक्षित भितींची  पाहणी  केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग भीमा सोडण्यात आला होता. या नदी काठी पूरपस्थिती निर्माण झाली होती.  शेत पिकांच्या नुकसानी बरोबरोच घरांची पडझड झाली आहे. प्रशासनाने  नुकसान ग्रस्त भागांचे  तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या

 तसेच कुंभारघाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे मरण पावलेल्या अभंगराव कुंटुबियांच्या नातेवाईकांची भेट केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी घेऊन केंद्र शासनामार्फत मदत देण्यासाठी  आवश्यक  ती कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे,नगरसेवक, पदाधिकारी आदी  उपस्थित होते.

पूरपरस्थिमुळे पंढरपूर तालुक्यात निर्माण झालेल्या विविध नुकसानीची माहिती तसेच  नदीवरील वांधण्यात आलेल्या  घाटासंबधित  माहिती तसेच  कुंभारघाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे  करण्यात आलेल्या कार्यवाही  यांची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  यांना दिली

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago