उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे उपचारानंतर १०२ वर्षाच्या आजींची कोरोनावर यशस्वी मात
दिनांक २१/१०/२०२०: उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथील योग्य औषधोपचारानंतर, पंढरपुर
तालुक्यातील मौजे गादेगाव येथील १०२ वर्षाच्या आजींने कोरोना आजारावर यशस्वीपणे मात
केली आहे.
मौजे गादेगाव येथे राहणाऱ्या १०२ वर्षाच्या आजींला अस्वस्थ वाटु लागल्याने व
शछवासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने , दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी उपजिल्हा
रुग्णालय पंढरपुर येथे अत्यवस्थ अवस्थेत दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना अहवाल
हा पॉजीटीव्ह आला होता.व शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण ८४ टक्के होते तसेच त्यांना दम
लागत होता व कोरोना संबंधीत इतर सर्व लक्षणेही दिसुन येत होती.
उपजिल्हा रुग्णालयाचे फिजीशिअन डॉ.सचिन वाळुजकर यांचे मार्गदर्शनाखाली या
आजीवरती ऑक्सीजन लावुन, सलाईनव्दारे प्रतिजैविके व इतर औषधे देऊन ,कोविड वॉर्डातील
सर्व वैद्यकिय अधिकारी ,अधिपरिचारीका ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ , आणि वर्ग-४ कर्मचारी यांनी
यशस्वीपणे उपचार केले व या आज्जींची चांगल्या प्रकारे काळजी घेतली .
त्यामुळे या आजीची कोरोनाची लक्षणे हळुहळु पुर्णपुणे नाहीशी झाल्याने आज दिनांक
२१ ऑक्टोबर रोजी त्यांची सहा मिनीटे वॉक टेस्ट घेऊन व शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण
९९ टक्के आढळुन आल्याने त्यांना आज डिस्चार्ज करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हा
रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ.जयश्री ढवळे व नोडल ऑफीसर डॉ..प्रदीप केचे यांनी
दिली.
सोलापुरचे जिल्हाशल्यचिकित्सक मा .डॉ.प्रदीप ढेले व निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.मोहन
शेगर यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १३ जुलै २०२० रोजी उपजिल्हा रुंग्णालय पंढरपुर येथे
८० खाटांचे डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्यात आले. जे आज कोरोना
विरुध्दच्या लढयात पंढरपुर शहर व तालुकयातील नागरिकांसाठी वरदान ठरत आहे.
आजतागायत सुमारे ९५० रुग्ण हे कोविड संशंयीत म्हणुन येथे उपचारासाठी दाखल
झाले होते.त्यापैकी ५९६ रुग्ण पॉजीटीव्ह आढळुन आले.यापैकी ३४६ रुग्ण शहरीभागातील तर
पंढरपुर तालुक्यातील ग्रामीण भागातील २५० रुग्ण होते. सौ म्य ते मध्यम लक्षणे असणार्या सुमारे ९६ रूग्णांना ५ ते ६ दिवसाच्या औषधोपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना वाखरी येथील कोविड केअर सेंटर येथे पाठविण्यात आले.तसेच गंभीर स्वरुपाची लक्षणे व न्युमोनिआ असणाऱ्या रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले व रुग्ण बरे झाल्यानंतर या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाच्या स्वॅब टेस्टींग टीमने आजतागायत २९ ०० आरटीपीसीआर टेस्ट,त र ४२०० हुन आधिक रेॅपीड अॅन्टीजेन टेस्ट केल्या आहेत.
कोविड साथकाळात उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे उपचारासाठी दाखल होणाऱ्या
रुग्णांना सेवा देत असताना उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागातील व कोविड वॉर्डातील वैद्यकिय अधिकारी , अधिपरिचारीका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,वर्ग-४ कर्मचारी अशा एकुण २६
अधिकारी व कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाली होती.तरीही अपुऱ्या व उपलब्ध मनुष्यबळामध्ये उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर अविरतपणे व चांगल्या पध्दतीने सेवा बजावित आहे.तसेच कोविड बरोबरच उपजिल्हा रुग्णालयातप्र सुती,सीझेरीअन शस्त्रक्रिया,डायलेसीस दैनंदिन बाहय विभाग ओपीडी अशा प्रकारच्या नॉनकोविड सेवाही चांगल्या व अविरतपणे सुरु आहेत.उ पजिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डात उत्कृष्ठ सेवा बजाविणारे, वैद्यकिय अधिकारी डॉ.अ नंत पुरी,अधिपरिचारीका श्रीम. रुपाली परबतराव,कक्षसेवक श्री .अंकुश क्षिरसागर, श्रीम .सीता घंटे यांना १५ ऑगस्ट रोजी सोलापुर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.दत्तात्रय भरणे यांचे हस्ते व मा.जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या उपस्थितीत कोविड योध्दा म्हणुन सन्मानित करण्यात आले.
तसेच कोविड वॉर्डात उत्कृष्ठ सेवा बजाविणारे कक्षसेवक श्री.मोहन व्हावळे यांचा मा.
राज्यपाल ,महाराष्ट्र राज्य मा.भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते व राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.
राजेशजी टोपे यांचे उपस्थितीत दिनांक १५ ऑक्टोंबर २०२० रोजी कोविड योध्दा म्हणुन
प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ.जयश्री ढवळे यांनी दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…