धाराशिव साखर कारखाना युनिट२ देवळा, नाशिक सन२०२०-२१चा बाॅयलर अग्निप्रदिपन व ३५वा गळीत हंगामाचा शुभारंभ

धाराशिव साखर कारखाना युनिट२ देवळा,
नाशिक सन२०२०-२१चा बाॅयलर अग्निप्रदिपन व ३५वा गळीत हंगामाचा शुभारंभ

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ,बागलाणाचे आमदार श्री.दिलीप बोरसेसाहेब, कळवण- सुरगाणाचे आमदार श्री.नितीन पवारसाहेब, महाराष्ट्र राज्य सह.बँकचे मा.सदस्य अविनाश महागांवकर, देवळा- चांदवडचे आमदार डाॅ. राहूल आहेर, आवसायक राजेंद्र देशमुख, शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.

बाॅयलरला अग्नि देऊन, काटा पुजन केले. ऊस भरून आलेल्या वाहनांचे पुजन करून,गव्हाणीत मान्यवरांच्या व प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली.

गतवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाच वातावरण आहे. या वर्षीदोन हजार हेक्टर कारखान्यास ऊसाची नोंद आली आहे. ट्रॅक्टर व ट्रकचे ३५०करार करून हाफ्ता ही देण्यात आला आहे. येत्या दिवसांत भागात टोळ्या टाकून ऊस आणला जाईल. कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून चांगल्या प्रमाणात गाळप करण्याचा मानस आहे.

कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड करताना १०००१, ८००५ ऊसाची जास्तीत जास्त लागवड करावी. जेणेकरून आपला ऊस लवकर कारखान्यास लवकर गाळपास आणता येईल.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक सुरेशतात्या सावंत, संतोष कांबळे, सजंय खरात, संदीप खारे,विकास काळे, तसेच रविराजे देशमुख, सत्यजित फडे,सुरज पाटील, गौरव दोशी, युनियन अध्यक्ष अशोक देवरे, भागातील पदाधिकारी, ज्येष्ठ मंडळी व कारखान्यातील सर्व खाते प्रमुख अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, वाहन ठेकेदार उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago