घाट बांधणी कामाच्या ठेकेदारावर व जबाबदार अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा
शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
पंढरपूर शहरात काल कुंभार घाट येथे नव्याने बांधकाम सुरु असेलल्या घाटाची भीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ निष्पाप नागिरकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.सदर घाटाचे काम अतिशय निकृष्टपध्द्तीने होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने काही महिन्यापूर्वीच करण्यात आली होती.मात्र तत्कालीन फडणवीस सरकारकडे या ठेकेदारासाठी आग्रही असेलल्या एका आमदाराने पाठराखण केल्यामुळेच व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याशी ठेकेदाराशी मिलीभगत असल्याने निकृष्ट पद्धतीने काम केले जात असतानाही डोळेझाक करण्यात येत होती.आता या निकृष्ट कामामुळेच ६ जणांचा हकनाक बळी गेला असून सदर प्रकरणी ठेकेदार व सदर कामाची जबाबदार असणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी आपण शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली आहे.
या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनानुसार या तीर्थक्षेताच्या ठिकाणी चंद्रभागा नदी काठी जलसंपदा विभागाच्या वतीने नव्याने घाट बांधणीचे काम गेल्या दोन वर्षपासून सुरु आहे. सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी विविध व्यक्ती,संस्था,संघटना यांनी तक्रारी केल्या होत्या. तर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही सदर गंभीर बाब जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून देण्यात आली होती.मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सदर दगडी घाट बांधणीसाठी थेट मातीचा वापर भर म्हणून करण्यात येत होता त्यामुळे मोठी नाराजी व्यक्त होत होती व धोका वर्तवला जात होता.
बुधवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी दुपारी अतिवृष्टीचा फटका सहन न झाल्याने हि नव्याने बांधण्यात आलेली घाटाची दगडी भिंत कोसळून ६ निष्पाप नागिरकांचा बळी गेला असून हि बाब अतिशय वेदनादायक आणि संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या अनास्थेचे,हलगर्जीपणाचे प्रतीक आहे.आणि सदर घटनेस पूर्णतः ठेकेदार व अक्षम्य दुर्लक्ष करणारे संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे आपण या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन सदर प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत व या नव्याने होत असलेल्या घाट बांधणीच्या कामाची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…