विठ्ठलराव शिंदे कारखाना एफआरपी पेक्षा १०० रुपये जास्त देणार -आ.बबनराव शिंदे
विठ्ठलराव शिंदे सह.सा.साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
यंदा २० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट तर करकंब युनिटसाठी २ लाख टन ऊस पाठविणार
माढा तालुक्यातील पिंपळनेर,गंगामाई नगर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्याहस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला.यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन तथा माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव शिंदे यांनी कारखान्याच्या वाटचालीबाबत माहिती देत गत २०१९-२० च्या गळीत हंगामात कारखान्याकडे गाळपास आलेल्या उसाच्या थकीत एफआरपी पैकी दोनशे रुपये आणि अधिक शंभर रुपये असे तीनशे रुपये लवकरच बँक खात्यावर वर्ग केले जातील.या वर्षी कारखान्याकडे २२ संभाव्य लाख टन उसाची नोंद असून २ लाख टन ऊस करकंब येथील युनिट क्रमांक २ कडे गाळपास पाठविण्यात येणार आहे अशी माहिती दिली, या वर्षी कारखान्याने २० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून तीन कोटी लिटर इथेनॉल निर्मित तर ११ कोटी युनिट वीज निमिर्ती केली जाणार असल्याचेही आ. बबनराव शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जि.प.सदस्य रणजित शिंदे,सभापती विक्रमीसिह शिंदे,विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे विविध संचालक,कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे,मुख्य शेतकी अधिकारी संभाजी थिटे,जनरल मँनेजर एस.आर.यादव यांच्यासह कारखान्याचे सभासद व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…