शिवसेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुखपदी तानाजी मोरे यांची निवड

शिवसेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुखपदी तानाजी मोरे यांची निवड

शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान

शिवसेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुख पदी पंढरीतील धडाडीचे क्रियाशील शिवसैनिक तानाजी मोरे यांची निवड करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. प्रा.आ. तानाजीराव सावंत सर यांच्या आदेशानुसार नुकतेच त्यांना निवडीचे पत्र शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत सर यांच्या हस्ते देण्यात आले. यापुर्वी तानाजी मोरे यांनी शिवसेना विभागप्रमुख पदावर सक्रीयपणे काम केलेेले आहे.

आपल्या निवडीबद्दल बोलताना शिवसेनेचे नुतन पंढरपूर शहर उपप्रमुख तानाजी मोरे म्हणाले की, ‘‘माझ्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेवुन सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. प्रा.आ. तानाजीराव सावंत सर, सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत सर, जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे, पंढरपूर मंगळवेढा उपजिल्हाप्रमुख सुधीरभाऊ अभंगराव, पंढरपूर तालुका प्रमुख महावीर देशमुख, पंढरपूर शहर प्रमुख रविंद्र मुळे या सर्वांनी माझी उपशहरप्रमुखपदी निवड केल्याबद्दल मी सर्व वरिष्ठांचा आभारी आहे. यापुढे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन.’’

तानाजी मोरे हे गेल्या अनेक वर्षापासुन शिवसेनेमध्ये सक्रीय राहुन राजकीय क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाऊनच्या काळात त्यांनी लक्षवेधी समाजकार्य केलेले आहे. पंढरीतील टांगा चालक-मालक यांना अत्यावश्यक वस्तु, किराणा माल, घोड्यांसाठी चारा उपलब्ध करुन दिला. बैलगाडीवाले, छकडेवाले यांनाही अन्नधान्याचे कीट वाटप केले. तसेच रिक्षाचालकांनाही अन्नधान्याचे कीट वाटप केले. या सर्व बांधवांना लॉकडाऊनमुळे चरितार्थ चालविण्यासाठी मोठा हातभार तानाजी मोरे यांनी लावला. लॉकडाऊनच्या संपुर्ण कालावधीत टांगा चालक, रिक्षा चालक, बैलगाडी-छकडा चालक या बांधवांना मोठा दिलासा देण्याचे लक्षवेधी कार्य तानाजी मोरे यांनी केलेले आहे. याचबरोबर लॉकडाऊन काळात पंढरपूर येथील बसस्थानकावरील बेवारस, दगडी पुल, दर्शनबारी पत्राशेड तसेच विविध घाटावरील तसेच शहर परिसराच्या विविध भागातील बेवारसांना जेवणाची मोफत सुविधा त्यांनी उपलब्ध करुन दिलेली आहे.

बचत गटातील महिला भगिणींना मायक्रोफायनान्सवाले वसुलीसाठी त्रास देत असताना संबंधित फायनान्सवाल्यांना समज देवुन येथील महिला भगिणींना दिलासा देण्याचे कार्यही त्यांनी केलेले आहे. सर्वसामान्यांच्या विविध गरजांसाठी वेळेत धावुन जाणारे व अडी-अडचणीच्या काळात सर्वांसाठी कायम उपलब्ध असणारे तानाजी मोरे यांची शिवसेना पंढरपूर शहर उपप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago