एफआरपीची थकीत रक्कम न दिल्यास ‘विठ्ठल’चा बॉयलर प्रदीपन समारंभ हाणून पाडणार
जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांचा इशारा
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने गेल्या दोन वर्षापूर्वी ची प्रलंबित ऊसाची बिले कायदा पायदळी तुडवुन अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली नाहीत. तरी येत्या 8 तारखेला विठठ्ल कारखान्याचा अग्नीप्रदिपन कार्यक्रम होणार आहे तो होऊ देणार नसल्याचे प्रभाकर देशमुख यांनी सांगीतले.
तसेच ऊस वाहतूकदारांची भाडे व कामगारांच्या संपूर्ण पगारी संबंधितांच्या खात्यावर जमा कराव्यात या मागणीसाठी व या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसील कार्यालय समोर गेल्या तेरा दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. मा जिल्हाधिकारी शंभर कर साहेब व मा तहसीलदार डॉ वैशाली वाघमारे यांनी आंदोलनाची दखल घेऊन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालया मध्ये एक तारखेला बैठक लावली त्यामध्ये तहसीलदार डॉ वैशाली वाघमारे यांनी बैठकीत विठ्ठल कारखान्याचा विषय जिल्हाधिकारी यांचे समोर घेतला नव्हता पहिल्या निवेदनात दिलेल्या मागणीप्रमाणे गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने सुद्धा ऊस उत्पादक शेतकरी ऊस वातुक भाडेकरी व कामगार यांच्यावर देखील सातत्याने दोन वर्षापासून हा अन्याय सुरु आहे विठ्ठल कारखान्या कडे दोन वर्षापूर्वीचे ऊस उत्पादकांचे 177 रुपये म्हणजे पाच कोटी 80 लाख रुपये ऊस उत्पादकांची येणे बाकी आहे त्यांनीसुद्धा ऊस नियंत्रण कायदा पायदळी तुडवून कष्टकरी शेतकऱ्या वरती सातत्याने अन्यायकरीत आहेत मा.साखर आयुक्त मा जिल्हाधिकारी व मा तहसीलदार यांनी विठ्ठल कारखान्यावर आर आर सी ची कारवाई करावी कारण इतर कारखान्या बरोबर विठ्ठल कारखान्यावर आर आर सी ची कारवाई करण्याचे निवेदन माजिल्हाधिकारी आणि मा तहसीलदार यांना यापूर्वी दिलेले आहे त्यामुळे तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे यांनी स्वतः यात लक्ष घालून आपली कर्तव्यद्क्षता पार पाडून शेतकऱ्यांना व कामगारांना न्याय द्यावा अन्यथा विठ्ठल कारखान्याच्या अग्निप्रदिपन होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.
यावेळी ‘जनहित’ चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब ताड, श्रीकांत नलवडे, संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर भोसले, सचिन आटकळे, सुभाष शेंडगे, बाळासाहेब सपाटे, संतोष चव्हाण, पंढरपूर शहराध्यक्ष मारुती भुसनर, रोपळे येथील औदुंबर गायकवाड, कुलदीप कदम, आबा गुंड, अमित व्यवहारे, तानाजी गायकवाड, सर्जेराव पाटोळे, सुग्रीव माने, सचिन भुसे, सुखदेव घोडके, विजय शेळके, विठ्ठल भुसे, भजनदास पवार तसेच असंख्य शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.