पंढरपूर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहनांसह २५ लाखांचा गुटखा जप्त
५ जणांवर गुन्हा दाखल
काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत पंढरपूर शहर पोलिसांनी २५ लाख १७ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पानमसाला व सुगंधित तंबाखू आदी माल वाहनासह ताब्यात घेण्यात आला आहे.या बाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार रात्री साडेबाराच्या सुमारास पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो.हे.कॉ.ढेरे,पो.हे.कॉ. हेंबाडे,पो.नाईक पाटील हे रात्रगस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार एका संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात असता सदर एम.एच. १२ एस.एफ. ४१४६ व एम.एच. १२ क्यूडब्ल्यू ०८५७ या वाहनातून प्रतिबंधित गुटखा आदीची वाहतूक होत असलयाचे आढळून आले सदर वाहन ताब्यात घेऊन या बाबतची माहिती अन्न विभागास कळविण्यात आली.
या प्रकरणी आरोपी वाहन चालक सागर दत्तात्रय महाजन, रविंद्र रामचंद्र दिवार, योगेश काळभोर(साठा मालक), विष्णू प्रजापत(वाहन मालक), निलेश काळभोर (वाहन मालक) यांचेवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा शिक्षपात्र कलम ५९ व भा द वि कलम १८८, २७२, २७३,३२८, 34 प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन, पंढरपूर येथे सदर आरोपी प्रतिबंधित साठा कोठून आणला, कोणाला देणार होते, अजून कोठे साठा करून ठेवला आहे का, या व्यवसायातील भागीदार कोण आहे का याची माहिती मिळणे करिता सरकारतर्फे सदर फिर्याद देण्यात आली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…